शिवकालीन इतिहास सामाजिक भान जपण्याची प्रेरणा देतो - माजी आमदार नरेंद्र पवार

जनदूत टिम    15-Nov-2021
Total Views |
कल्याण : कल्याण पश्चिम येथील अंबिका निवास चाळ, ठाणकर पाडा येथे शिवस्व ग्रुपच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या किल्ले सिंहगडची प्रतिकृती पाहण्यासाठी माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी भेट दिली.

pawar_1  H x W: 
 
दरवर्षी शिवस्व ग्रुपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व पराक्रम युवा पिढीस कळावा व यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी याकरिता विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. शिवरायांचे कर्तृत्व आणि शिवकालीन इतिहास सामाजिक भान जागृत करते, ते जपण्याची प्रेरणा देते असे मत यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
 
यावर्षी शिवस्व ग्रुपने नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा खरा पराक्रम पुढे आणण्याकरिता उत्कृष्टपणे साकारलेल्या किल्ले सिंहगडच्या प्रतिकृती बद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. युवा पिढीला इतिहासाची गोडी लागण्यासाठी आणि इतिहास माहिती होण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचेही माजी आमदार नरेंद्र यांनी सांगितले.
 
यावेळी सोबत शिवप्रतिष्ठाणचे प्रमुख श्री.मयुरेश धुमाळ व सहकारी,श्री.राज भरत पाटील तसेच किल्ले सिंहगडची प्रतिकृती साकारणारे कु.ओंकार चव्हाण, कु.अरविंद गुप्ता, कु.भूषण गिरधर, कु.द्रुवेश भरडवा, कु.सतेंद्र गुप्ता, कु.दिलीप गुप्ता, कु.अर्णव म्हात्रे, कु.अक्षय चव्हाण, कु.प्रणव तांबोळी, कु.इंद्रजित गुप्ता,श्री.मयुरेश गालिंदे आदि. युवक मित्र, मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.