वासिंदसह हजारो ग्रामस्थांचा रस्ता खुला झाला..!

जनदूत टिम    30-Oct-2021
Total Views |
वासिंद / ठाणे: गेल्या ४ वर्षांपासून रखडलेला वासिंद पूर्व भागातील रस्ता अवघ्या दोन दिवसांतच सरकारी यंत्रणेने तातडीने पूर्ण केला.आज ग्रामस्थांनीच लोकार्पण सोहळा साजरा करीत प्रचंड जल्लोष करीत वासिंदसह हजारो ग्रामस्थांचा एकमेव रहदारीचा व वाहतूक रस्ता खुला केला.
 
vasind_1  H x W
 
वासिंद येथील समाजसेवक संजय सुरळके यांनी केलेल्या बेमुदत उपोषणाला जबरदस्त प्रतिसाद व पाठिंबा मिळाला.सतत २ दिवस हे उपोषण यशस्वी झाले. शहापूर तहसीलदार निलीमा सुर्यवंशी, शहापूर पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे,वासिंद पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील, कनिष्ठ अभियंता आनंद वाघमारे यांनी तातडीने निर्णय घेतला.व अवघ्या दोन दिवसांतच सिमेंट कौक्रिट चा सरकारी रस्ता तयार करण्यात आला.
शहापूर तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांनी प्रखर व आक्रमक भूमिका घेतली व स्वतः पुढाकार घेऊन पोलिस बंदोबस्तात उपोषण स्थळी निर्णय जाहीर केला.व रस्ता कामाबाबतीत आदेश दिले.
 
आज समस्त वासिंदकर ग्रामस्थांनी लोकार्पण सोहळा पार पाडला.फटाकेची आतषबाजी, ढोल ताशा पथक, रांगोळी काढून प्रचंड जल्लोष करीत या सरकारी रस्ताचे आगळे वेगळे लोकार्पण करण्यात आले.