“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

जनदूत टिम    16-Oct-2021
Total Views |
मुंबई : आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही, अन् आपला आवाज दाबणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही. असं विधान शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. मला पण बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर सर्वांना साद घालता आली.
 
ud2_1  H x W: 0
 
आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात फार महत्वाचा व मोलाचा आहे. सुवर्ण क्षण असतो हा. जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी १९६६ मध्ये सुरू केली. ती समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सोबतीने आपण पुढे नेत आहोत, याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी हा क्षण आणि हा दिवस आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठीचा असतो.
 
आपण पाहिलं असेल, शस्त्रपुजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली, आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरी शस्त्र आहेत, ही शिवसेना प्रमुखांना मला दिलेली आहे. आणि हे आशीर्वाद घेत असताना, माझ्या मनात नेहमी एक नम्र भावना असते. हेच प्रेम सर्वप्रथम प्रत्येक जन्मी मला माझे हेच आई-वडील मिळाले पाहिजेत.
 
विजयदशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र,उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.