पड्घ्यात राजकारणाचा कलगीतुरा !

जनदूत टिम    06-Jan-2021
Total Views |

ग्रामपंचायत निवडनुकीत पराभवाचा भीतीने मनसे उमेदवार रवींद्र विशे आणि कार्यकर्त्यांना भाजप चे माजी सरपंच पराग पाटोळे यांचाकडून धमक्या

पडघा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
 
पडघा : सध्या भिवंडी तालुक्यात ५३ ग्राम पंचायतींमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना,प्रत्येक ग्राम पंचायती मधून उमेदवारी अर्ज भरण्याची आणि अर्ज मागे घेण्याची तारीख नुकतीच उलटून गेली आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये निवडून येण्या साठी चढा ओढ पाहायला मिळत आहे ,अशातच पडघा ग्राम पंचायत चर्चेचा विषय ठरत आहे ती उमेद वरांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे .
 
Padgha_1  H x W
 
सलग दोन टर्म भाजप चा हातात असलेल्या पडघा ग्राम पंचायत कार्यकारणी वर अनधिकृत बांधकामे ,बेकायदेशीर कब्जे ,कोरोणा काळात उपाय योजनांमध्ये निष्क्रियता ,फुटलेले रस्ते ,पाण्याचा समस्या या सर्व कारणामुळे पडघा ग्रामस्था नाराज असल्याचे वारंवार दिसून येत आहे ,अशातच भाजप ला पड्घ्यात मनसे चा रूपाने पर्याय मिळाल्यामुळे पराभवा चा भीतीने भाजप उमेदवार श्री पराग पाटोळे यांचा कडून मनसे उमेदवार रवींद्र विशे व त्यांचा कार्यकर्त्यांना फोन वरून धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत या संदर्भात मनसे उमेदवार रवींद्र विशे यांचा कडून स्थानिक पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधिक्षकांनकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
 
या संदर्भात रवींद्र विशे यांचाशी संपर्क साधला असता, पराग पाटोळे यांची पराभवाचा भीतीने पाया खालची वाळू सरकली असल्याने ते स्वत आणि स्वत सोबत असलेल्या गुंड प्रवृतीचा लोकांना हाताशी धरून माझा कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत ,तसेच निवडणुकी दरम्यान मला ते स्वताचा गाडीत टाकून पळवून नेण्याची किंवा माझावर हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे मी तक्रार दिली आहे असे सांगण्यात आले. त्यामळे लोकशाही चा आधार स्तःम्भ मानल्या जाणाऱ्या निवडणुका ह्या मतदाराचा मतदानाने लढल्या जातात कि धमक्यांनी असा प्रश सर्व मतदारांना पडला आहे .