कोकण बाजार माणगांव तर्फे गरिबांना ऊबदार चादरिंचे वाटप.'

नरेश पाटील     05-Jan-2021
Total Views |
माणगांव :  दोन महिन्या पूर्वी माणगांव नगरीत नव्याने स्थापन झालेल्या कोकण बाजार माणगांव यांचे कडून तालुक्यातील दुर्बल घटक असलेल्या गरीब जनतेस सामाजिक हित जपत या हिवालयाच्या मोसमाच्या काळात चांगल्या टिकावू आणि दर्जेदार ऊबदार चादर वाटप करण्यात आले.

mangaon_1  H x
 
हे वाटप सोमवार दि.04 जानेवारी 2021रोजी दुपारच्या समयी कोकण बाजार माणगांव, मोर्बा रोड माणगांव शहर येथे संपन्न झाले.या समयी कोकण बाजार माणगांवचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आयुब आली ढोकळे तसेच पार्टनर श्री. इनयातुला बंधरकर प्रामुख्याने उपस्थित होते.त्याच सोबत मोर्बा शहरातील नामंकित आयुब करझीकर हे हि अवर्जून होते.
या कार्यक्रमची सुरुवात परमेश्वर यांचा नामस्मरण करत तालुक्यातील कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक गरीब गरजवंत यांना पडत असलेल्या कडाक्याच्या थंडी पासून सरक्षण मिळावे म्हणून वाटप करण्यात आले. सुमारे 150 ऊबदार चादर वाटप करण्यात आल्या.दरम्यान अमरदीप संस्था तसेच सर्व विकास दीप संस्थेच्या अध्यक्ष ( फादर रिचर्ड क्वाड्रोस ) या समयी हजेरी लावले होते. या संस्थेकडून लाभार्थी यांचा यादी कोकण बाजार ( माणगांव )कडे देण्यात आले होते. शेवटी अमरदीप संस्थेच्या अध्यक्ष भगिनी रुबीना यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कोकण बाजार माणगांव यांचे आभार मानले. त्याच बरोबर 25 घोंगडी ब्लॅंकेट खांदाड येते गरीब वृद्ध यांना देण्यासाठी राजीपाचे माजी सभापती श्री. ज्ञानदेव पोवार यांचा कडे सुपूर्द करण्यात आले तसेच नाणोरा, मोर्बा आणि लोणशी येतेही वाटप करण्यात येणार आहे असे कोकण बाजारकडून प्रतिनिधीस माहिती देण्यात आले होते.