महाड वरंध घाटात ट्रक अडकल्याने वाहतूक विस्कळीत

जनदूत टिम    28-Jan-2021
Total Views |
महाड : महाड वरंध पुणे मार्गावर वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड वाहन अडकल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेली कांही महिने हा मार्ग दुरुस्तीसाठी अवजड वाहनांसाठी बंद आहे मात्र तरी देखील पुणे भागातून अवजड वाहने पाठवली जात असल्याने अनेकवेळा अवजड वाहने अडकून मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.

mahad47_1  H x  
 
महाड भोर पुणे मार्गावर वरंध घाटात सलग दोन वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत आहेत. यामुळे गेली दोन वर्षे हा मार्ग सातत्याने बंद ठेवला जात आहे. यामुळे हा मार्ग अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाकडून देखील एस.टी. बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. असे असले तरी पुणे विभागातून अवजड वाहने सोडत असल्याने अनेक वेळा वरंध घाटात अवजड वाहने अडकत आहेत. वरंध घाटात आज सकाळी अवजड टँकर अडकून पडला आहे. यामुळे वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.