बायपास मुळे माणगांव बाजारपेठचा वैभव कमी होणार नाही.' खा. सुनील तटकरे

नरेश पाटील     28-Jan-2021
Total Views |
माणगांव : रविवार दि.24 जानेवारी 2021 रोजी सकाळचा समयी माणगांव शहर एसटी स्टॅंडचा आवारात असलेल्या ठक्कर कॉम्प्लेक्स मध्ये व्ही मार्ट या नावाने असलेल्या भव्य सुपर मार्केटचा फित कापून शानदार उदघाटन रत्नागिरी तथा रायगड लोकसभेचा आदरणीय खा. सुनिलजी दत्तात्रय तटकरे यानी केले.

TATK487_1  H x
 
या समयी नगराध्यक्ष योगिता ग.चव्हाण, माजी राजीपा विरोधी पक्ष नेते राजीवजी साबळे, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष शेखरसेठ देशमुख, पंचायत समितीचे सभापती अलकाताई जाधव, सदस्य शैलेश भोनकर, अध्यक्ष,मा.ता. महिला रा.कॉ.पा.सौं. संगीता बक्कम, नगरसेवक रत्नाकर उभारे,नवनिर्वाचित पोलादपूर, महाड - माणगांवचा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, माणगांव ता.रा. कॉ. पक्षाचे युवक अध्यक्ष रुपेश तोडकर, माणगांव शहर रा.कॉ.अध्यक्ष मोहम्मदशेठ धुंद्वारे, जिल्हा शेकाप चिटणीस मंडळाचे सदस्य ऍड. कौस्तुभ धामणकर,ता.मनसे अध्यक्ष सुबोध जाधव उद्योजक विलास जैन, विकेश जैन, तलाठी निजामपूर सजा मारुती चाटे तसेच या सुपर मार्केटचे निमंत्रक तसेच बिसनेस पार्टनर दीपक जाधव (सचिव, युवक रा.कॉ.पा. महाराष्ट्र प्रदेश), भागवत चाटे, उद्योजक बळीराम गोवारी, प्रशांत कामते, विलास येळकर आणि ऋषीकेश जैन आदी होते.
आपल्या भाषण मध्ये खा.तटकरे यानी सुरुवातीला सर्व मान्यवर, व्ही मार्टचे सर्व टीम सदस्य आणि मोठ्या संख्येनी उपस्थित सर्व जनतेस यांना मौखिक स्वागत केले. पुढे व्ही. मार्ट या सुपर मार्केटचा विविध महत्वाचे विषयला स्पर्श करीत,दर्जेदार ब्रँडेड वस्तू, सर्व उपयुक्त वास्तूचे उपलब्ध करून दिलेल्या बाबी, संपूर्ण वर्षालाच डिस्काउंट आणि ऑफर्स ग्राहकांसाठी देण्याचे विषय बाबी, ग्राहक यांचा विश्वास संपादन करण्यासाठी चांगले आदरभावनाचे सेवा देणे, आपण या शहरात या चांगला उपक्रम राबवून या उद्योगात यशश्वी होताना मला आनंद व समाधान मला होत आहे, सोबत माणगांव शहराचे प्रचंड वाढ दिवसोनदिवस होत आहे तर दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गचे चौपादरीचे काम चालू आहे त्यातच अत्ता काही दिवसाने बायपास होणार आहे. असे असताना माणगावचा वैभवला तसेच बाजार पेठेला काहीही फरक पडणार नाही असा महत्वाचे मत मांडले. पुढे गोवा कडे जाणारे प्रवासी बायपासने जातील मात्र खेड, चिपळूणला जाणारे लोक माणगांवचा प्रत्येक गोष्टीची रुचकरपनाने खायची,खरीदीची सवय आहे. त्यामुळे ते बाय पास मधून न जाता माणगांव मधूनच नक्की जातील .अंती त्यांनी व्ही मार्ट या भव्यदिव्या कार्यक्रमला मला बोलविल्याबद्दल धन्यवाद देऊन शुभेच्छा दिले.