माणगांव येते राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने साखळी धरणे आंदोलन

नरेश पाटील    14-Jan-2021
Total Views |
माणगांव : काही महिना पूर्वी केंद्र सरकारने देशाचे शेतकरी साठी नवीन कायदे पारित केले होते. त्यात प्रमुख तीन कायदे हे शेतकरी तीव्र विरोध करीत आहे. त्या अनुषंगाने अत्ता संपूर्ण नवीन कायदेच रद्द वहावे म्हणून गेल्या दीड महिनाहून आदिक काळ देशाचे राजधानी दिल्ली येते राज्याचे अनेक शेतकरी ढेरे दाखल होत आंदोलन करीत आहे.
 
Mangaon 556987412_1 
 
या शेतकरी यांचा आंदोलनास आपला पाठिंबा म्हणून तसेच शेतकरी विरोधी काळे कायदाचा विरोधात आणि ईतर प्रमुख मुद्दे जसे इव्हीयम हटाव मोहीम म्हणून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे व राष्ट्रीय किसान मोर्चा वतीने देशभर दि.११ ते १७ जानेवारी २०२१ पर्यंत धरणे आंदोलन सुमारे ५५० जिल्हा मध्ये सरकारी कार्यलय समोर साखळी पद्धतीने धरणा प्रदर्शन सुरु केले आहे.
 
सदर आंदोलनाचा एक भाग म्हणून रायगड जिल्यात दोन युनिट बनवून एक धरणे आंदोलन उत्तर रायगड पनवेल येते तसेच दुसरा दक्षिण रायगड जसे मुख्य ठिकाणे माणगांव तालुक्यातील माणगांव शहर येते प्रांत कार्यलयचा आवारात सोमवार दि. ११ जानेवारी -२०२१ पासून सकाळी सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनास तालुक्यातील शेतकरी भाग घेत आहे असे राकेश मोरे संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चा रायगड जिल्हा यानी सांगितले.दरम्यान COVID19 मार्गदर्शन पाळून या धरणे आंदोलन पार पडत आहे.
 
या धरणे आंदोलनसाठी रायगड जिल्हा बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक मिलिंद साळवी, राष्ट्रीय किसान मोर्चा रायगड जिल्हा संयोजक राकेश मोरे, भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शिंदे, भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड, संयोजक गफ्फारभाई राहटविलकर, प्रकाश कासे, संकेत कासारे, मंगेश पारवे, प्रदीप ठोंबरे, मुबीन कोंडविळखर, मौलाना रिजवान जळगांवकर, शेतकरी मन्सूर दाऊद सैन, संतोष दाखिनकर,महाड ता. संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चाचे लक्षमन हाटे, शेतकरी सुभाष मोहिते, संजीवन तांबे, संदीप सोनवणे, साहिल कासारे, अशोक सकपाळ सिधीक परदेशी साहेब आदी बहू संख्येनी उपस्थिती होते.