कळव्यात प्रथमच क्रिकेटचा महासंग्राम

जनदूत टिम    14-Jan-2021
Total Views |
कळवा : कळव्यात प्रथमच क्रिकेटचा महासंग्राम तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजु दादा मित्र परिवार व राष्ट्रवादी युवती कॉग्रेस अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा कु.पुजा राजु शिंदे आयोजित भव्य दिव्य प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा म्हणजेच नामदार चषक २०२१ स्पर्धा पार पडली.
 
Cricket02565_1  
 
अंतिम दिवशी राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि माजी विरोधी पक्षनेते मा. मिलिंद पाटील साहेबांनी तसेच इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून स्पर्धेची शोधा वाढवली या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी भाग घेतला होता त्यामध्ये ठाणे मुंबई नवी मुंबई पालघर भिवंडी वसई या परिसरातून संघ आले होते विशेष म्हणजे यूट्यूब च्या लाईव्ह माध्यमातून स्पर्धेचा आनंद कळवा परिसरातील नागरिकांनी घेतला आणि प्रेषकांनी पण या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला.
 
तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मा.ऋता ताई आव्हाड, राष्ट्रवादी युवती कॉग्रेस ठाणे जिल्ह्या अध्यक्षा पल्लवी ताई जगताप , राष्ट्रवादी युवती कॉग्रेस अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा कु.पुजा राजु शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्या सचिव राजु दादा शिंदे , युवक अध्यक्ष विक्रम खामकर माजी नगरसेवक हेमंत खारकर यांच्या हस्ते करण्यात आल.
 
या स्पर्धेत खुल्या गटाच प्रथम पारितोषिक विजेता संघ ठरला तो WORLI SPP ( UMESH 11 ) तर द्वितीय पारितोषिक चा मानकरी ठरला तो VIKHROLIANS संघ.. ठाणे गटाच प्रथम पारितोषिक विजेता संघ ठरला मेघा वाघबील तर द्वितीय पारितोषिक चा मानकरी ठरला तो ( ONE SIDE ) वर्तक नगर. कोरोना च्या महामारी नंतर महाराष्ट्रात प्रथमच प्रकाश झोतातील हि क्रिकेट स्पर्धा अवघ्या महाराष्ट्रात गाजली हि स्पर्धा यशस्वी करण्या मागे मोलाचा वाटा होता तो विरेश तावडे , विवेक राणे , जावेद शेख , व्यंकट मुडलीयार सचिन भोसले आणि राजु दादा मित्र परिवार.....