जि.प. उपाध्यक्षांच्या हस्ते जव्हार व डहाणू च्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार

जनदूत टिम    13-Jan-2021
Total Views |
पालघर : कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया १००% च्या वर यशस्वी करण्याचे उद्दिष्ठ पूर्ण केल्याबद्दल डहाणू व जव्हार तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती निलेश सांबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Palghar55558_1  
 
जव्हार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील आणि डहाणू तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांना यावेळी गौरविण्यात आले. आदिवासी लोकसंख्या अधिक असणारे जव्हार व डहाणू तालुक्यांनी कुटुंब कल्याण चे उद्धिष्ठ पूर्ण करून उत्तम कामगिरी केली असून इतर तालुक्यांनी त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन त्यांनीही लवकरात लवकर आपले उद्दिष्ठ पूर्ण करावे असे प्रतिपादन यावेळी जि.प. उपा ध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले.
 
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यामध्ये जव्हार तालुक्याने १२०% तर डहाणू तालुक्याने ११०% उद्दिष्ठ पूर्ण केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे आयोजित करून कोरोना काळात आतापर्यत जव्हार ने ४४७ उद्दिष्ठ असताना ५५५ शस्त्रक्रिया केल्या. यात ९ पुरुष शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तर डहाणू तालुक्याने १२२९ उद्दिष्ठ असताना १३३१ शस्त्रक्रिया केल्या यात १८ पुरुष शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
 
आरोग्य सेविकांनी यामध्ये विशेष मोलाची भूमिका बजावली. यावेळी आरोग्य समितीचे सर्व सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, डॉ.अजय ठाकरे, डॉ. सागर पाटील तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.