तरूणांनो उचित उचित व्यवसाय निवडा - मा.प्रा. डीडी काठोळे

जनदूत टिम    13-Jan-2021
Total Views |
वासिंद : वासिंद जवळील मौजे पाली येथे स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे मंगळवारी १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय युवा दिन श्रीरंग विद्यालयाच्या माजी प्राचार्या शुभदा अजित गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला! याचवेळी राजमाता जिजाऊ यांची जयंतीही साजरी करण्यात आली.

vasind0254258_1 &nbs 
 
स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर सर यांनी कार्यक्रम अध्यक्षा तसेच कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवारांचा परिचय देऊन स्वागत केले! आपले प्रास्ताविक सादर करताना त्यांनी संस्थेचा हेतू, उद्देश व गेल्या २४ वर्षांपासूनची संस्थेची वाटचाल तसेच भविष्यातील संस्थेची दिशा स्पष्ट केली! खेड्यातील सर्व युवकांनी एकत्र येऊन गावाच्या व पर्यायाने राष्ट्राच्या विकासाचे ध्येय मनात ठेवून प्रामाणिकपणे समाजकार्य करण्याची आजच्या काळाची गरज आहे.
 
असे सुनील म्हसकर सर म्हणाले! यावेळी आजचा युवा आणि व्यवसाय या विषयावर व्यवसाय मार्गदर्शक व समुपदेशक डी.डी.काठोळे सर यांचे व स्पर्धा परीक्षा एक दिव्य या विषयावर माजी सैनिक मंगेश धिमते यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले! युवकांनी योग्य मार्गदर्शन घेऊन तसेच आपल्यातील क्षमता आणि आपली आवड लक्षात घेऊन उचित व्यवसाय निवडला पाहिजे असे मार्गदर्शक डी.डी. काठोळे सर यांनी सांगितले! तर आपण नेहमी मोठी स्वप्न पाहावी आणि तितक्याच मेहनतीने आपण स्वतः स्वतःशीच स्पर्धा करत जिद्दीने वाचन, व्यायाम आणि अभ्यासाचा व्यासंग ठेऊन स्पर्धा परीक्षा द्यावी व अधिकारी व्हावे! असे आदर्श अधिकारी झालो तर देशाचा विकास होईल! असे मंगेश धिमते यांनी म्हटले.
 
Vasind8888_1  H
 
 
संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच ठाणे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक, गुणवंत खेळाडू आणि विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता! यावेळी व्यासपीठावर दैनिक सकाळचे पत्रकार व वासिंद येथील सरस्वती विद्यालयाचे माजी प्राचार्य- कविवर्य भगवान जाधव, शेणवा हायस्कूलचे माजी प्राचार्य व्ही. एस. पाटील, ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद देशमुख, भिवंडी येथील पद्मश्री जाधव विद्यालयाचे प्राचार्य माळी सर, माजी पोलीस पाटील श्री पांडुरंग पाटील, उपसरपंच सौ.काजल तरणे आदी मान्यवर उपस्थित होते!
 
यावेळी राज्य कबड्डी प्रशिक्षक शंकर पाटील, जिल्हा कुस्ती प्रशिक्षक श्रीराम पाटील, कोकण शिक्षक आघाडीचे समन्वयक नथू भामरे सर, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अजय पाटील, सचिन पाटील, विजयकुमार देसले, महाराष्ट्र राज्य आदर्श युवा पुरस्कार विजेते अजित कारभारी, संगीतकार बाळकृष्ण पाटेकर, अनंता तरणे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नृत्य दिग्दर्शक अविनाश पायाळ तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू विनायक कारभारी, सुष्मीता देशमुख, किरण दळवी तर राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रशिक्षक नंदकुमार शेंडकर, दया झेंडे, मिलिंद तरणे, खेळाडू अर्पिता व सेजल पाटील, राज्य वक्तृत्व स्पर्धा विजेते सुनील परटोले, अनन्या व संस्कृती सदानंद म्हात्रे; कवी शिवाजी गोतारणे, संजय जाधव, संतोष जाधव, प्रशांत जाधव, मुकेश दामोदरे, पत्रकार एन.व्ही.पाटील, किरण निचिते, पंडित मसणे, बाळाराम तरणे, किशोर दळवी आणि भानुदास भोईर, माधुरी तारमळे, राजू मोरे, रमेश मगर, अरुण भालेकर, डॉ.शैलेश डोंगरे आदींना संस्थेतर्फे ठाणे जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले! तसेच पंचक्रोशीतील १० वी व १२वी, डिप्लोमा, डिग्रीच्या विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले!.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भगवान जाधव सर व संजय तरणे सर यांनी केले! गंधार संगीत विद्यालयाचे संस्थापक अनंता तरणे, प्रबुद्ध जाधव, जगदीश दिवाणे, महेंद्र पारधी यांनी सुमधुर असे ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले! यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच पाली गावच्या सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले! संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर यांनी उपस्थितांचे आभार मानून ऋणनिर्देश केले! कार्यक्रमाची सांगता
राष्ट्रगीताने झाली!