थिंकक्युअर 20 - संसर्गजन्य विषाणू द्वारे फैलावल्या जाणाऱ्या ताप, सर्दी, खोकला यावर संपूर्ण आयुर्वेदिक औषधाची निर्मिती

जनदूत टिम    12-Jan-2021
Total Views |

- सर्व परीक्षण COVID19 रुग्णांवर केले आहे
- चांगला परिणाम दिसून आला आहे
- चघळून खावयाच्या एकूण पंचवीस गोळ्यांचा पाच दिवसाचा परिणामकारक कोर्स

ठाणे : थिंक फार्मा या वैद्यकीय क्षेत्रातील औषध निर्मितीतील अग्रणी कंपनीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा संसर्गशीघ्रतेने कमी होऊ शकतो का? ह्यासाठी संशोधन केले आणि आधुनिक शास्त्राच्या कसोटीवर तपासून औषधनिर्मिती केली आहे.
 
Covid thana0256_1 &n
 
यातील ५०० मिलीग्रॅमची चघळून घेण्याची गोळी परिणामकारक असल्याचे थिंकफार्माने म्हटले आहे. ही गोळी दिवसातून चार वेळा चार ते पाच तासांच्या अंतराने चघळून घ्यावी. या गोळ्या पंचवीसच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत. या गोळ्यांचे उत्पादन भारतीय खाद्य सुरक्षा नोंदणी परवाना अंतर्गत केले आहे. नियमानुसार हर्बल घटकांचा वापर केला आहे. या बाबतच्या चाचण्या क्वांटिटेटिव्ह आरटीपीसीआर (RTqPCR) विश्लेषण यावर केलेले आहे. सर्व तपासण्या ICMR रजिस्टर्ड आणि NABL मान्यताप्राप्त लॅब मधून केले गेले.यामध्ये चार दिवसातच बहुतांश रुग्णांचे विषाणूंचे प्रमाण ९५ टक्क्याहून अधिक घटल्याचे डॉ. मिलिंद घारपुरे यांनी सांगितले. वायसीएम रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी यांनीदेखील या चघळून घ्यायच्या औषधांनी कोविड रुग्णांवर चांगला परिणाम दिसत असल्याचे नमूद केले. पुण्याच्या क्वेस्ट क्लिनिकल सर्विसेसच्या डॉ. हृषीकेश रांगणेकर यांनीही या औषधाचे चांगले रिझल्ट्स आल्याचे सांगत, इतर औषधांपेक्षा चघळून घेण्याची गोळी हे या औषधाचे वेगळेपण विशेषरित्या नमूद केले. उपचारांचा कालावधी हा पाच दिवसांचा आहे. यासाठी तोंडावाटे आणि नाकावाटे नमुने घेतले गेले. यातून संसर्गाचे प्रमाण सरासरी ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
 
पुणे येथे कोविड केंद्रात दाखल असलेले संसर्गित आणि उपचार घेण्याची इच्छा व्यक्त करणारे रुग्ण, तोंडावाटे आणि नाकाद्वारे चाचणीची अनुमती देणारे रुग्ण आणि अठरा वर्षाच्या वरील रुग्ण हे निकष थिंकफार्माने पहाणीसाठी लावले होते.
सुरवात दोन गोळ्यांनी करुन त्या पूर्णतः विरघळेपर्यंत चघळण्यास सांगितल्या. त्यानंतर चार तासांनी पुढची गोळी देण्यात आली. याप्रकारे दिवसभरात पाच गोळ्या देण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी याच क्रमाने चार गोळ्या देण्यात आल्या. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसाप्रमाणे चार गोळ्या देण्यात आल्या. याकाळात रुग्णांना त्यांची कोविड साठीची नियमित औषध घेण्याची अनुमती होती. त्या काळातील त्यांचा आहार नियमित होता. थिंकफार्माने कुठल्याही प्रकारची वेगळी पथ्य सांगितली नाही. थिंकक्युअरचा उपचार सुरु करण्यापूर्वी रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. ते नमुने संसर्गाचे प्रमाण लक्षात घेण्यासाठी मान्यताप्राप्त लॅब्रोटरीजना पाठविण्यात आले. तिसऱ्या दिवशी पुन्हा नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. पहिल्या आणि तिसऱ्या दिवसाच्या नमुन्यातील संसर्गप्रमाणाचे विश्लेषण केले गेले. ७० टक्क्यांनी संसर्ग कमी झाल्याचे दिसून आले.
 
या अभ्यासासाठी पंचवीस रुग्णांनी ऐच्छिक नोंदणी केली होती. त्यातील तेवीस रुग्णांनी नियमानुसार उपचार पूर्ण केले. एका रुग्णाच्या अहवालाचे विश्लेषण तांत्रिकदृष्ट्या अस्विकृत झाले. तर, अन्य एका रुग्णाने उपचार पूर्ण केले नाहीत. चोवीस (२४) मधील बावीस (२२) रुग्णांना उपचारांचा गुण आला. सोळा रुग्णांचे संसर्गप्रमाण ९३.६ ते ९९.९ टक्क्यांनी, चार रुग्णांचे७४ ते ७९ टक्क्यांनी आणि दोन रुग्णांचे ५० ते ७० टक्क्यांनी कमी (Reduction in % of Viral load done by RTqPCR method) झालेले दिसून आले. हे अहवाल उपचार सुरु झाल्या नंतरच्या शहाण्यव तासातील आहेत. ज्या दोन रुग्णांचे संसर्ग प्रमाण ५० ते ७० टक्क्यांनी कमी झाले होते त्यांनी पूर्ण पाच दिवस उपचार पूर्ण केल्यावर परिणाम चांगले दिसून आले.
 
फक्त एका रुग्णात उपचारांच्या तीन दिवसात संसर्गप्रमाण वाढल्याचे दिसून आले. ती वाढ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची निदर्शक होती. या गोळ्या आणि त्याद्वारे उपचार अठरा वर्षावरील कोणालाही घेणे सुरक्षित आहे, असे थिंक फार्माने म्हटले आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा नोंदणी परवाना असलेले पॉली-हर्बल फॉर्म्युलाचा वापर, केवळ पाच दिवसाची उपचार पद्धत, तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होणे, रुग्ण बरे होण्याच्या वेग वाढून लवकर आराम वाटू लागणे, क्वालिटी ऑफ लाईफ सुधारत जाणे हे थिंकक्युअरच्या २० उपचारांचे फायदे आहेत. थिंकक्युअर २० हे उत्पादन पुढील बेवसाइटवर ऑनलाइन उपलब्ध आहे. https://www.1mg.com/ , https://www.thinqstore.com/ अधिक माहितीसाठी आमच्या https://thinqure20.com/या वेबसाइटला भेट द्या.
 
प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या :
कुटुंबातील एका व्यक्तीला COVID19 चा संसर्ग झाल्याचे लक्षात येताच कुटुंबातील अन्य सदस्यांनी तात्काळ सलग पाच दिवस थिंकक्युअरच्या गोळ्यांचे सेवन करणे उपयोगी ठरेल.ँँ