राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात निषेध मोर्चासह रस्ता रोको

जनदूत टिम    12-Jan-2021
Total Views |
कल्याण: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिलेल्या आदेशानुसार आज कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी युवक जिल्ह्याच्या वतीने टाटा पावर हाउस ते दावडी गोळवली तलाठी कार्यालय येथे पेट्रोल डिझेल दरवाढ भाववाढीच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.
 
NCP Dombiovali_1 &nb
 
सदर प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रास्तारोको करून टु-व्हीलर ढकलत निश्चित नोंदवला. तसेच निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार कल्याण यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून अप्पर मंडळ अधिकारी कल्याण अविनाश तेलगोटे यांना निवेदन देण्यात आले.
 
सदर आंदोलनाचे नेतृत्व व आयोजन युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी केले होते. सदर प्रसंगी केंद्र सरकार अशी भाववाढ करून जनसामान्यांवर आर्थिक भार वाढवत आहे. त्यामुळे जनतेचा आक्रोश न बघता दरवाढ कमी करून जनतेची आर्थिक पिळवणूक त्वरित थांबवावी. असे न केल्यास आगामी काळात उग्र स्वरुपाचे आंदोलन हे केंद्र सरकारच्या विरोधात केले जाईल, असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी दिला.
 
यावेळी आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, मा.गटनेते उमेश बोरगावकर, समीर भोईर, स्वप्नील रोकडे, सुभाष गायकवाड, प्रशांत माळी, वैभव मोरे, भावेश सोनवणे, कल्पेश अहिरे, गिरीश पाटील, गणेश भोईर, उमेश सहाने, प्रशांत नगरकर, सुनील बोरणाक, राहुल पाखले, मोहम्मद खान, दत्ता भोईर, शरद म्हात्रे, आफताब खान, गुरु कडव, योगेश माळी, विश्वास आव्हाड, प्रसाद गायकवाड, वल्ली राजन, भाऊ पाटील, राजेंद्र नांदोस्कर, सुरेय्या पटेल, उज्वला भोसले, मीनाक्षी आहेर, सुलोचना पाटणेकर, बबीता राम, अजया आवारे, संगीता मोरे, चारुशीला पाटील, शबनम खान, सपना धनगर, रुबीना शेख, अशोक घोडके, ब्रह्मा माळी, विलास येवले, प्रकाश हरड, आबीद शेख, गिरीश लाडकर, कुकू तिवारी, अक्षय भास्कर, शमीम शेख, मुन्ना पाटील, धीरज राजाभोज, सुरेंद्र राठोड आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.