संजय सरफरे स्मृती चषक २०२१

जनदूत टिम    12-Jan-2021
Total Views |
डोंबिवली : शिवसेना, युवा सेना, तिरुपती बालाजी मित्र मंडळ , बी. के. डी बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. संजय सरफरे स्मृती चषक २०२१ भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले होते.
 
Cricket Dombivali_1 
 
९ जानेवारी आणि १० जानेवारी असे २ दिवस भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवासेना डोंबिवली शाखा अधिकारी ऋतूनील दशरथ पावसकर आणि तिरुपती बालाजी मित्र मंडळ अध्यक्ष अभिषेक सुधाकर साळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण आणि शहरी असे १६ संघ खेळले .
 
क्रिकेट हा खेळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये प्रत्येक विभागामध्ये खेळला जातो. प्रत्येक गल्लीमध्ये चांगले खेळाडू जन्माला येऊन ते आपल्याला आयपीएल किंवा वर्ल्ड टूर्नामेंट खेळताना दिसून येतात. हे लक्षात घेता युवासेना आणि तिरुपती बालाजी मित्र मंडळ टीमने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डोंबिवली येथे केले होते.
 
उत्कृष्ट फलंदाज ,गोलंदाज ,मालिकावीर, सामनावीर त्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात देण्यात आले. तसेच ९ जानेवारी रोजी डोंबिवली शिवसेना शहराध्यक्ष राजेश मोरे यांच्या शुभहस्ते स्पर्धचे उद्घाटन करण्यात आले. तसेच माजी सभापती दिपेश म्हात्रे यांच्यासह शिवसैनिकांनी स्पर्धेला भेट दिली .