योगेश पाटील आयोजित शासन कृत दाखले वाटप शिबिराचे आयोजन

जनदूत टिम    12-Jan-2021
Total Views |
डोंबिवली : मनसे आमदार राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच घारीवली गाव योगेश पाटील यांनी गावातील नागरिकांसाठी शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले आहे.
 
shibi02546_1  H
 
९ जानेवारी ते १४ जानेवारी विविध ठिकाणी विविध गावांत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यांमध्ये कासाबेला पलावा,कासाबेला गोल्ड, काटाई गाव,घारिवली, उसरघर गाव, संदप आदी गावांचा समावेश आहे . या शिबिरात उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र,स्थानिक प्रमाणपत्र नागरिकांना काढून देण्यात आले .
 
उत्पन्न , अधिवास आणि स्थानिक रहिवाशी दाखले हे सरकारी कामात अत्यंत महत्वाचे ठरणारे घटक आहे. काही शासकीय दाखले मिळवण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात हेलपटे मारावे लागतात . याच सोबत नागरिकांचा पैसा तर खर्च होतो पण वेळ सुध्दा खर्च होतो . हे लक्षात घेता प्रत्येक प्रभागात पाटील यांनी शासकीय दाखले शिबिर आयोजित केले आहे.