महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भिवंडी तालुक्याच्या वतीने शिक्षक संघटन दिन साजरा!

जनदूत टिम    11-Jan-2021
Total Views |
अंबाडी : स्वातंत्र्यपूर्व काळात वाडी, वस्ती, डोंगर, द-या व खेड्यापाड्यातून शिक्षणाची ज्योत सर्वसामान्यांसाठी तेवत ठेवून, प्राथमिक शिक्षण देण्याचे काम करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण समाजातील घटक म्हणजे प्राथमिक शिक्षक. या शिक्षकांचे आपल्या न्याय हक्कांसाठी संघटण असावे.
 
ambadi_1  H x W
 
अशा प्रकारची दूरगामी स्वरूपाची संकल्पना ज्या विचारवंतांच्या मनात आली आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारे महान विचारवंत, आदरणीय-आचार्य भिसे गुरूजी,आचार्य दादासाहेब दोंदे,आचार्य प्र.के.अत्रे आणि तत्सम या महान शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांनी प्राथमिक शिक्षकांचे संघटन असावे,भावी काळात त्याची नितांत गरज समजून सन-1914 साली ठाणे जिल्ह्यातील बोर्डी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला,तो दिवस म्हणजेच 7जानेवारी 1914 .या संघटन दिनानिमित्ताने भिवंडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या विधमाने तालुक्यातील जि.प. शाळा -कवाड येथे शिक्षक संघटन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
 
सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक नेते आदरणीय दिवंगत -शिवाजीराव (आण्णा)पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर शिक्षक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश भोईर सर, (जिल्हा नेते) विजय गायकवाड सर, (स्विकृत सदस्य शिक्षण समिती जि.प.ठाणे) दयानंद भोईर सर,यांनी उपस्थितांसमोर आपले मौलिक विचार मांडताना, आजच्या प्राथमिक शिक्षकांचे जीवनमान बदलणार्‍या आदरणीय दिवंगत-शिवाजीराव (आण्णा)पाटील यांच्या कार्याचे स्मरण करताना ,शिक्षक संघाचे कार्य जोमाने करण्याची प्रेरणा आजपासून घेतली पाहिजे,आणि संघाची शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारच्या भावना संबंधित वक्त्यांनी आपल्या मनोगतातून यावेळी व्यक्त केल्या.
 
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल पाटील सर यांनी केले,तर सूत्रसंचालन  काशिनाथ शिंदे सर यांनी केले व आभार प्रदर्शन आश्विन पाटील सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरूण गायकर सर, अनिल शेलार सर, विजय शिंदे सर, नारायण गायकर सर, सोपान कदम सर, राजकुमार पाटील सर, सौ.जागृती आमरे मॅडम, सौ.संध्या भालेराव (हजारे)मॅडम आदिंनी विशेष सहकार्य केले.