मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेची विद्यार्थींनी कु. साधना सुरेश कुले हिचे निबंध स्पर्धेत सुयश

जनदूत टिम    10-Jan-2021
Total Views |
माणगांव : शहीद वीर यशवंतराव घाडगे (व्हिक्टोरिया क्रॉस) जयंती उत्सव शनिवार दि.९ जानेवारी २०२१ रोजी सकाळचा समयी कार्यक्रमाचे आयोजन प्रांत कार्यालयाच्या आवारात करण्यात आले होते.
 
mangad025_1  H
 
देशासाठी शहीद झालेले वीर यशवंतराव घाडगे यांच्या कार्याची ओळख व्हावी, स्मरण व्हावे, त्यांच्या बलिदानातून प्रेरणा, स्फूर्ती मिळावी यासाठी दरवर्षी प्रांतकार्यालय माणगाव यांचे वतीने धाडगे उत्सवचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षीची COVID19 प्रादुर्भाव परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वरील स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आज रायगड जिल्हा पालकमंत्री मा. कुमारी आदितीताई तटकरे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
 
१ ते ८ छोट्या गटासाठी चित्रकला स्पर्धा व मोठ्या ९ ते १२ गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरील स्पर्धेत मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती एस.के भाटे माध्यमिक विदयालय बोरवाडी मधील इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी कुमारी साधना सुरेश कुले हिने मोठ्या गटातील निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्ल रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.कुमारी आदितीताई तटकरे यांचे शुभहस्ते कुमारी साधना सुरेश कुले हिस प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 
पालकमंत्री मा.कुमारी आदितीताई तटकरे यांनी शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या कार्याची माहिती देऊन,त्यांचे देशप्रेमी आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.असे गौरोद्धार काढले. वरील कार्यक्रमाचे आयोजन प्रांताधिकारी मा.सौ.प्रशाला दिघावकर मॅडम यांवे वतीने करण्यात आले होते.या समयी पंचायत समितीचे मा.सभापती जाधव मॅडम,माजी सभापती मा. सौ.संगिताताई बक्कम,नगराध्यक्षा मा.सौ.योगिता चव्हाण,मा. सुभाषजी केकाणे मा. शैलैशजी भोनकर व्यासपीठावर उपस्थित होते. वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेशजी सावंत व सूत्रसंचालन सौ.काफ मॅडम यांनी केले.
 
मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नितीनजी पवार, कार्यवाह संतोषजी रणपिसे सर, चेरमन ज्ञानेश्वरजी रणपिसे, मुख्याध्यापक ए.आर.कुशिरे सर, संस्था व शाळा समिती मा.पदाधिकारी, शिक्षक,पालक यांनी कुमारी साधना सुरेश कुले हिचे अभिनंदन केले आहे.