टिटवाळा मधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक बाबू कुलकर्णी यांचा मृत्यू की हत्या ! हे अजूनही गुलदस्त्यात !!

जनदूत टिम    10-Jan-2021
Total Views |

गुन्हा नोंद होऊन सुद्धा टिटवाळा पोलीस स्टेशन कारवाई करत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद

टिटवाळा : टिटवाळा गणपती मंदिराच्या परिसरात असलेले हॉटेल व्यावसायिक बाबू गेनू कुलकर्णी यांच्या सन२०१८ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी मानलेली मुलगी विनिता शिवनाणीं यांनी टिटवाळा पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१, ५०४ आणि ३४ अन्वये आरोपी भाऊ व वहिनी सुनील श्रीचंद बुधराणी, आरती सुनील बुधराणी , कमल श्रीचंद बुधराण यांचा विरोधात तक्रार दाखल केली गेली होती

Babu Kulkarni_1 &nbs
 
तक्रार दार यांचे वडील श्रीचंद मनुमल बुधराणी हे मुंबईहून ३६ वर्षांपूर्वी टिटवाळा येथे स्थायिक झाले होते.त्यावेळी त्यांनी त्यांचे निकटवर्ती बाबू गेनू कुलकर्णी यांना देखील ते मुंबईहून टिटवाळा येथे घेऊन आले होते ,श्रीचंद बुधराणी यांच्या मृत्यूनंतर बाबू कुलकर्णी हे तक्रारदार व आरोपी यांचा सोबत राहत होते तक्रारदार यांचा आई-वडिलांच्या व्यवसायामध्ये बाबू गेनू कुलकर्णी हे मदत करीत असत. तक्रारदार व आरोपी जे त्यांना बाबा असे म्हणत असत.
 
दिनांक ०७/०१/२०१८ रोजी तक्रारदार विनिता शिवणानी यांना त्यांची छोटी वहिनी रेणू अमर बुधराणी यांनी पहाटे ४:०० वाजता फोन करून कळविले आणि लवकर निघून या असे सांगितले. तक्रारदारचे पती आणि दोन्ही मुलं घेऊन लगेच कार ने टिटवाळा येथील गणेशभुवन येथील घरी आले. तक्रारदार यांनी बाबू गेनू कुलकर्णी यांना जवळ जाऊन बघितल्यानंतर समाजाच्या रितिरिवाजप्रमाणे मयत इसमाचे पोट फुगू नये म्हणून मयत इसमाच्या पोटावर तुपात भिजवलेले कापूस ठेवतात, बाबू गेनू कुलकर्णी यांच्या पोटावर कापूस ठेवण्यासाठी गेले असता, निरखून बघितलं असता तक्रारदार विनिता शिवणानी यांच्या लक्षात आले की, बाबू कुलकर्णी तर नाईट ड्रेस घालून झोपत असत. परंतु त्या परिस्थितीत पांढऱ्या रंगाचे फुल शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली होती, पॅन्ट आणि शर्टची काही बटने त्यावेळी तक्रारदार यांना उघडी दिसली. बाबू गेनू कुलकर्णी यांनी बॉडी पूर्णपणे काळी पडून नखे सुद्धा काळी झाली होती. त्यावेळेस तक्रारदार यांना सदर मृत्यू संशयास्पद असल्याची शंका आल्या नंतर लहान भावांना बाबू कुलकर्णी कसे मयत झाले अशी विचारणा केली असता, त्यांचे भाऊ कमल यांनी सांगितले की मोठा भाऊ सुनील आणि वहिनी आरती असे तिघेजण रात्री 2 वाजता बाबू कुलकर्णी याची तब्येत अचानक बिघडल्याने सुनीलच्या कार ड्रायव्हर सोबत महागणपती हॉस्पिटल टिटवाळा येथे घेऊन गेले. परंतु हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच ते मयत झाल्याचे कमल यांनी सांगितले.
 
तक्रारदार यांनी दिनांक टिटवाळा महागणपती हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत्यूबाबत चौकशी केली असता तेथील हजर असलेल्या सिस्टर कडून सांगण्यात आले की, हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या एक तास अगोदरच मयत झाले असून सादर नमूद संशयित आरोपींनी. शवविच्छेदन नाही करायचे असे सांगून प्रेत अँबुलन्सने घरी नेले.
अंत्यविधी नंतर काही दिवसांनी तक्रारदार यांनी भाऊ सुनील यांच्या घरी जाऊन बाबांच्या (बाबू कुलकर्णी )मृत्यू पत्राबाबत चौकशी केली असता, वहिनी आरती बुधराणी हिने उडवाउडवीची उत्तरे देवून तक्रारदाराला शिवीगाळ केली. तेव्हा तक्रारदार यांना खात्री झाली की, बाबांचा मृत्यू नसून घातपात झालेला असून, बाबांचे मृत्यू प्रमाणपत्र व इतर कागदपत्र खोटे बनवून मयत बाबू गेनू कुलकर्णी यांचा अंत्यविधी केला गेला आहे.
या नंतर प्रॉपर्टीच्या वादातून आमच्या बाबांची( बाबू गेनू कुलकर्णी ) यांची हत्या केल्याचा आरोप त्यांची मुलगी विनिता शिवणानी यांनी तक्रार दाखल करून सुद्धा टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस इतकी मवाळ भूमिका का घेत आहेत. तक्रारीची चौकशी का करत नाहीत ?पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का??? अश्या बऱ्याच उलटसुलट चर्चा परिसरात होत आहेत.