मनसे सैनिक राहुल जयवंत पाटील यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप

जनदूत टिम    10-Jan-2021
Total Views |
डोंबिवली : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान सुसह्य व्हावे. त्यांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार त्यांना मिळावे म्हणून सरकारने ज्येष्ठ नागरिक कार्ड सुविधा ज्येष्ठांसाठी उपलब्ध केली आहे.
 
MNS258_1  H x W
 
परंतु अद्याप काही ज्येष्ठांना या सुविधेचा लाभ घेता आला नाही किंवा त्या सुविधेबद्दल माहिती नाही. हे लक्षात घेता उद्योगपती तथा मनसे सैनिक राहुल जयवंत पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिराचे तसेच ० बॅलन्स अकाउंट अर्थात जनधन योजना शिबिराचे आयोजन त्यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या.
 
त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना जेष्ठ नागरिक कार्ड प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना अनेक सरकारी ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात , यातून वेळ तर जातोच पण पैसेही खर्च होतात . हे लक्षात घेता प्रभागातील नागरिकांसाठी राहुल पाटील यांनी शिबीराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. यावेळी अविनाश पाटील, नितीन घाडीगावकर,ऋषभ सोनावणे,ऋषिकेश चोपडे, नरेश जगदेव आदी पदाधिकारी उपस्थित होते.