पडघा ग्रामपंचायत हद्दीत आश्रमशाळेचे बांधकाम परवाना गौडबंगाल आहे तरी काय?

कैलास ढमणे    04-Sep-2020
Total Views |

बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा उच्च स्तरीय चौकशी ची मनसे चे रवींद्र विशे यांची मागणी

पडघा : देशात जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचा नावाने शासकीय जमिनी लाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत असाच प्रकार सध्या पडघा अर्जुनली ग्राम पंचायत हद्दीत पाहायला मिळत आहे.
 
Ravindra Vishe_1 &nb
 
पिसे येथे मंजूर झालेल्या आश्रम शाळेचे बांधकाम पडघा ,अर्जुनली ग्राम पंचायत हद्दीत कसे?पडघा अर्जुनली हद्दीत सुरू असलेली आश्रम शाळा ही पिसे येथे मंजूर असताना नक्की असे काय झाले की ती तिथून हलवून पडघे येथे न्यावी लागली, या आश्रम शाळेचा बांधकाम साठी पिसे ग्रामपंचायत ने ठराव घेऊन गुरचरंण सर्वे नंबर ४८ मध्ये जागा जागा उपलब्ध करून दिली असताना देखील आश्रम शाळा पडघे अर्जुनली मध्ये हलवली गेल्या मुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेपडघा ग्राम पंचायत हद्दीतील गुरचरण भातसा कालवा प्रकल्प ग्रस्थाना भाडे तत्वावर दिली असताना त्याच जागेवर बांधकाम कसे?प्रस्थावीत आश्रम शाळेचे बांधकाम ज्या जागेवर सुरु आहे ती शासनाने पडघा अर्जुनली ग्राम पंचायत चा परवानगीने ठराव घेऊन भातसा कालवा प्रकल्प ग्रस्थाना भाडे तत्वावर दिली आहे परंतु कोणती ही परवानगी न घेता त्याच जागेत आश्रम शाळेचे बांधकाम साहित्य टाकून परस्पर बांधकाम आदिवासी विकास प्रकल्प विभागा कडून सुरु केल्या मुळे या बांधकामाची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.
 
शासन निर्णय नुसार भातसा कालवा प्रकल्प ग्रस्थाना जागा उपयोगात नसेल तर ती जागा पुन्हा ग्राम पंचायत ला हस्तांतरित केली जाते आणि मग पुन्हा ग्राम पंचायत ठराव घेऊन ती जागा इतर प्रकल्प विभागाला हस्तांतरित करते परंतु इथे सर्व नियम पायदळी तुडवून हे बांधकाम कोणाचा मांमर्जीने आणि हितसंबंधाने सुरु आहे याचा शोध घेणे गरजेचे आहेआश्रम शाळेचा बांधकाम परवानगी संदर्भात पडघा अर्जुनली ग्राम पंचायत अनभिज्ञपडघा अर्जुनली हद्दीत सुरू असलेल्या आश्रम शाळेचा बांधकाम ठराव बाबत पडघा ग्राम पंचायत सरपंच पराग पाटोळे यांना विचारणा केली असता, सदर आश्रम शाळेचा बांधकाम ठराव बाबत कोणती ही कागतपत्रे आजतागायत सादर केली नसून त्या संदर्भात कोणता हि ठराव झाला नाही तसेच संबंधित बांधकाम थांबवण्या साठी आम्ही संबंधितांना पत्र देखील दिले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
या अर्जुनली ग्राम पंचायत सरपंच यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाहीविद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्या मागणीला प्रकल्प अधिकाऱ्यांकडून केराची टोपली?पिसे येथे सुरू असलेली आश्रम शाळा बांधकाम कोसळले असे कारण दाखवून कुरुंज येथे हलवली गेली होती त्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यमान आमदार शांताराम मोरे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र लिहून पिसे गुरचरं येथील जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली त्यामुळे प्रकल्प कोणाचा हिताचा असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेतबेकायदेशीर पणे सुरु असलेले आश्रम शाळेचे बांधकाम देखील निकृष्ट दर्जाचेआश्रम शाळेच्या परवांनग्यान संदर्भात गौडबंगाल असताना संबंधित प्रकल्प विभागा कडून बांधकाम करण्याचा करोडो रुपयांचा ठेका तथाकथित नाशिक येथील ठेकेदाराला दिला गेल्याची माहिती प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर कळाली विस्तृत पाहणी केली असताना अनेक गंभीर बाबी समोर आल्या ,सुरू असलेले बांधकाम कामगारांकडून कोणत्या ही प्लॅन शिवाय सुरु होते.
 
रेती ऐवजी निकृष्ट दर्जाचे ग्रीड पावडर बांधकाम साठी वापरली जात असल्याचे दिसून आले ,तसेच तिथे उपलब्ध असलेल्या सुपर वायझर कडे वर्क ऑर्डर ,नकाशाव तत्सम कागद पत्रांची मागणी केली असता त्यांजी उडवा उडवीची उत्तरे देत कागतपत्रे नाशिक कार्यालयात असल्याचे सांगितले,तसेच सर्व प्रकारचे दगड खडी पुरवण्याचे कंत्राट देखील मांमर्जीने दिले गेल्याचे चित्र समोर आले आहेबेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून ,शासनाचा करोडोंचा निधीचा भ्रष्टचार थांबवून ,जागा पुन्हा खाली करून ग्राम पंचायत ला हस्तांतरित करण्याची मनसे चे रवींद्र विशेची मागणीसदर बेकायदेशीर आणि मुलांच्या जीविताशी खेळ करणारे निकृष्ठ बांधकाम त्वरित थांबवून जागा पुन्हा ग्राम पंचायतीला हस्तांतरित करावी व नियोजित पिसे हद्दीत ही आश्रम शाळा योग्य ठेके दार निवडून बांधली जावी ,तसेच या संबंशीत सर्व प्रकारची उच्च स्तरीय चौकशी शासन स्तरातून व्हावी अशी मागणी मनसे चे रवींद्र विशे यांचा कडून केली जात असून त्यांचा या मागणीला परिसरातील लोकांकडून जोर धरला असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर सदर बांधकाम स्थगिती आणि निष्कशीत करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी या वेळी जनदूत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.