माज आलेले पंचायत समितीचे अधिकारी भवारी व बनसोडे (गायकवाड) हरले...माहिती अधिकार कार्यकर्त्याचा १ वर्षांनी झाला विजय

जनदूत टिम    04-Sep-2020
Total Views |
शहापूर : प्रत्येक वेळा कायद्याचा जणू मी बापच आहे असे अकलेचे तारे सितारे तोडणाऱ्या शहापूर पंचायत समितीचा माज आलेला गट विकास अधिकारी व तालुक्याच्या विकासाचा मीच ठेका घेतला आहे अशा रुबाबात वावरणारी विस्तार अधिकारी बनसोडे (गायकवाड) यांना कोकण आयुक्त, माहिती अधिकार यांच्यापुढे सपशेल शरणागती पत्करावी लागली. तर १ वर्षांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याचा उशिरा का होईना पण विजय झाला असे चित्र तालुक्यात स्पष्ट झाले.
 
representative_1 &nb
 
यावरून एकच लक्षात आले की भ्रष्टाचारा विरोधातील लढाईत अपिलार्थी जिंकला व हे दोन्ही -ऑफीसर ज्यांची मुळ ओळख अशीच आहे शहापूरात भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांना पाठीशी घालणे ते हरले. विषय होता तालुक्यातील ५ ग्राम पंचायतींचा. त्यात प्रामुख्याने ज्या ग्राम पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्या ग्राम पंचायती खातिवली, अजनुप, साने पाली, लाहे आणि दहिगाव. मागील वर्षी आमसभेत या विषयावर सामाजिक कार्यकर्ते तथा शहापूर तालुका विकास मंचचे अध्यक्ष संतोष भेरे यांनी आवाज उठविला होता. सदरच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाविरोधात झालेल्या तक्रारी, बीट विस्तार अधिकारी याच्या मार्फत झालेली चौकशी, सादर केलेला अहवाल, दोषी आढळलेल्या ग्राम सेवकावर केलेली कारवाई ही माहिती मागवली होती. परंतु भ्रष्टाचारी ग्राम सेवकांसोबत विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांचे साटेलोटे असल्या कारणाने ते माहिती देण्यास तयार नव्हते.
 
माहिती देत नसल्याने २७/०९/२०१९ ला भेरे यांनी पहिले अपील केले होते. माज आलेल्या गट विकास अधिकारी अशोकराव भवारी विरोधात ३०/०९/२०१९ रोजी संतोष भेरे यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे दुसरे अपील केले होते. या अपिलाची २८/०८/२०२० रोजी तब्बल ११ महिन्यांनी सुनावणी झाली. भवारी व बनसोडे (गायकवाड) यांनी गोपनीय अहवाल देता येत नाही असे सांगितले. भ्रष्टाचार कसा व्यवस्थीत करावा याची पदवी प्राप्त करणाऱ्या दोघांची आयुक्त बिष्णोई यांनी चांगलीच ससे होलपट केली. मिस्टर भवारी आणि मिसेस बनसोडे (गायकवाड) यांची खरडपट्टी करताना तुमच्या अशा वागण्याने लोकांची शासकीय यंत्रणेवरील पारदर्शकतेवर शंका निर्माण होवू शकते हे ही सांगितले. येत्या १५ दिवसात अपिलार्थी यांना माहिती द्यावी अशी सूचना केली. या सुनावणी दरम्यान बोल-बच्चन करणाऱ्या या दोघांची भेरे यांनी बोलतीच बंद केली. यामुळे सदरच्या ग्रामपंचायतीना न्याय मिळवून देण्यासाठी अपिलार्थी यांनी विडाच उचलला आहे हेच लक्षात येत आहे. समाजपयोगी, निस्वार्थपणे भ्रष्टाचार विरोधी लढा उभा करणाऱ्या संतोष भेरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.