भरामसाठ वीज बिल आकारणी: भाजपा कल्याणचे महावितरण कार्यालयावर आंदोलन

जनदूत टिम    04-Sep-2020
Total Views |

वीजबिल माफ करण्याची पत्राद्वारे केली मागणी'

कल्याण : लॉक-डाऊन' च्या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये वीज वितरण कंपनीने वीज बिलांची जी भरमसाठ आणि अवाजवी आकारणी केली जात आहे त्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमने गंभीर दखल घेत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे.
 
Narendra Pawar_1 &nb
 
महावितरण विभागाला वारंवार सूचना आणि देऊनही वीजबिलात वाढ होत असल्याने ढिय्या आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'लॉकडाऊन' च्या कालावधीत गेले काही महीने वीज वितरण कंपनीकड़ून शहरातील वीज ग्राहकांच्या 'मीटरचे रीडिंग घेतले गेले नाही. मागील बिलांच्या आधारे सरासरी काढून वीज बिल आकारण्यात आले, परिणामी ग्राहकांना भरमसाठ बिले आली.त्यामुळे कंपनी विरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे.
 
महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सामान्य माणसांना न्याय मिळत नाहीत. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत, आर्थिक घडी विस्कटलेली असताना महावितरण विभाग मुद्दामहून वाढीव बिले पाठवून छळ करत आहे. या काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिल माफ करावे यासाठी भारतीय जनता पार्टीने कल्याण शहर, मोहोने व टिटवाळा या ठिकाणी आंदोलन करत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवली आहेत.
 
सामान्य माणसांना आधार देण्याची गरज असताना मुद्दामहून देत असलेला त्रास वीज बिल माफ करून तातडीने थांबवावा अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहोने - टिटवाळा मंडलअध्यक्ष शक्तीवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर, बुधाराम सरनोबत, किरण रोटे, अमोल केदार, प्रिया शर्मा, पुष्पा रत्नपारखी, नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेवक दया गायकवाड, रितेश फडके, रमेश कोनकर, सदा कोकणे, अनंता पाटील, राजेश यादव, गौरव गुजर, भावना मनराजा, नीरजा मिश्रा, प्रमोद घरत, संदीप पाटील, निर्मला पवार, प्रीती दीक्षित,परेश गुजरे आदि पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.