पंढरपूर-विजयपुर रेल्वेमार्गासाठी आ भारत नाना भालके रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

जनदूत टिम    27-Sep-2020
Total Views |
सोलापूर : पंढरपूर-विजयपूर रेल्वेसाठी आ.भारत भालकेंचा रेल्वेमंत्र्यासोबत पत्रव्यवहार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात 'या' कारणांमुळे शिक्षक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात दुर्लक्षित पंढरपूर-विजयपूर रेल्वेसाठी आ.भारत भालकेंचा रेल्वेमंत्र्यासोबत पत्रव्यवहार दुर्लक्षित पंढरपूर-विजयपूर रेल्वेसाठी आ.भारत भालकेंचा रेल्वेमंत्र्यासोबत पत्रव्यवहार कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर हा मार्ग पूर्ण होणे आवश्यक आहे.
 
Nana 01_1  H x
 
याबाबत आमदार भारत भालके यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पत्र पाठविले होते. त्याचे उत्तर रेल्वेमंत्र्यांनी आमदार भालके यांना पाठविले आहे. पंढरपूरच्या विठूरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्राबरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात परंतु, त्यांचा परतीचा प्रवास सुखकारक होत नाही. तो व्हावा यासाठी तत्कालीन केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर - विजयपूर हा १०८ किलोमीटरचा रेल्वेमार्ग २०१४-१५ मध्ये मंजूर करून घेतला.
 
त्यासाठी १ हजार २९४ कोटी खर्च अपेक्षित होता. पण , त्यासाठी निधी दिला नाही. या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास आणि पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूर मार्गे वाढणारे अंतर , खर्च , वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर-मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे , डाळींब,ज्वारी, साखर व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्य होणार आहे. विजयपूर-पुणे हे अंतर ३७४ किलोमीटर आहे व ३६० किलोमीटर पंढरपूर मार्गे होणार आहे.
 
खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित असताना त्यांनी नुकतीच सोलापूर रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वराचे नाव देण्यासंदर्भातील मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघात असलेल्या पंढरपूर-विजयपूर रेल्वे मार्गाचा विषय केंद्रात सत्ता असताना त्यांनी मार्गी लावणे अपेक्षित आहे.