कोरोनातही पशुवैदयक करतात घरोघरी गुरांचे लसीकरण

जनदूत टिम    26-Sep-2020
Total Views |

शासनाकडून दखल नाही

ठाणे : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोना रोगाचे महामारीने खेडेगावात मोठा अहाकार माजवलेला आहे.सर्व गावेच्या गावे बाधीत असतानाही आणखी एक सरकारी अधिकारी कर्मचारी यांचा वर्ग मार्च महिन्यातील लाॅकडाऊन पासून कायम कार्यरत राहून शेतकरी वर्गाचे मुक्या जनावरांवर रांत्रदिवस औषधोपचार सेवा देत आहे पण अजूनही शासनाकडून या पशुवैदयकीय डाॅक्टरांची हवी तशी दखल घेतलेली नाही.लाॅकडाऊन काळापासून आजपर्यंत पशुसंवर्धन विभागातील पशुचिकीत्सा अखंड सुरु आहे.
 
Buffelo 2_1  H
 
या विभागाचे बिगर पदवीधर पशुवैदयक हेच खरे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांचे पशुदूत डाॅक्टर म्हणून ओळखले जातात.आजच्या मोबाईल जमान्यात कोणताही शेतकरी आता दवाखान्यात आपली जनावरे घेऊन न येता फक्त एक फोन काॅल करुन डाॅक्टराना आपल्या गोठयावरच बोलावतो व त्यांचे कडून गायी म्हैशीची प्रसूती करणे,गायी म्हशीचे अंग (भांडे) बसवणे, गर्भाशयातील जार काढणे,स्तनदाहावर व इतर असंख्य आजारावर उपचार करणे,जनावरांचे खच्चीकरण करणे यासह अनेक शासकीय योजना प्रचार आणि प्रसारासह गावोगावी पशुवैदयकीय शिबीरे घेणे इत्यादी अत्यंत अवघड कामे आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.
 
कधीकधी तर जनावरांवर उपचार करताना पशुंपासूनचे अत्यंत गंभीर आजार अनेक पशुवैदयकांना झाले आहेत.असे असतानाही आता शासनाने या गुरांचे डाॅक्टराना आणखी एक काम वाढवून दिले आहे ते म्हणजे सर्व जनावरांच्या कानाला बिल्ला मारुन त्याची ऑनलाईन नोंद इनाफ नावाचे प्रणालीवर घेण्याचे!पूर्वीचा दुधउत्पादक शेतकरी यांचा औषधोपचार लसीकरण करणारा डाॅक्टर आता उपचार सेवा कमी आणि ऑनलाईन कामांनी आणि रोजच्या अनेक अहवाल यांनी पुरता व्यस्त केला आहे.ठाणे जिल्हा हा शहरीकरणाकडे अधीक झुकल्याने येथील पशुधनही घटले आहे.२०व्या पशुगणनेत ते सिद्ध होत आहे तरीही शासनाकडून दरवर्षी तांत्रिक कामाचे लक्षांक वाढवून दिले जात आहेत.
 
Buffelo 1_1  H
 
या सर्व कामांचा बोजा वाढल्याने या संवर्गातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांना माणसिक व शारीरिक आजाराने ग्रासले आहे.या विभागातील ऐंशी टक्के कर्मचारी अती ताणाने मधुमेह, रक्तदाब व हृदयविकाराने बाधीत आहेत तरीही आता कोरोनाचे महामारीत सर्व पशुवैदयकीय कर्मचारी घरोघरी जाऊन लाळखुरकूत रोगाचे लसीकरण व टॅगीग करीत आहेत.यामध्ये एक जनावर बांधताना किमान तीन माणसे लागतात यामध्ये शारीरिक अंतर राखणेचे नियमाला पुर्ण हरताळच फासला जातो.त्यामुळे अनेक डाॅक्टर यांना बाधा झाली तर काही बाधीत होण्याचे छत्रछायेखाली आहेत.काहीना हे काम करीत असताना अनेकदा जीवघेणे प्रसंग उद्भवले आहेत.परंतू तरीही या पशुवैदयकीय डाॅक्टराना माणसांचे डाॅक्टर प्रमाणे मायबाप शासन व राजकीय व सामाजिक संस्था मधील नेते व कार्यकर्ते अजूनही कोरोना योद्धा मानायला तयार नसल्याने आमच्या पशुचिकीत्सकांना विमा सुरक्षा कवच नाही अशी खंत पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष डाॅ.दिलीप धानके यांनी व्यक्त केली आहे.
 
तसेच पशुसंवर्धन विभाग कडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सुरक्षा किटचा पुरवठा देखील झालेला नाही.कोरोनाचे महामारीत तुमचे तुम्ही लढा आणि मरा हे वरीष्ठ अधिकारी यांचे या पशुवैदयकीय अधिकारी कर्मचारी यांचे बाबत असलेले धोरण निषेधार्ह आहे.तरी जोपर्यंत कोरोनाची महामारी जात नाही किंवा या रोगाचा खेडेगावातील आलेख कमी होत नाही तोपर्यंत या लाळखुरकूत रोगाचे लसीकरण व टॅगीग बाबतची फेरी ठाणे जिल्हाधिकारी यांनी स्थगित करावी अशी मागणी पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना ठाणे जिल्हा यांचे कडून आवाहन करण्यात आले आहे.फक्त लसीकरण व टॅगीग मोहीम तात्पुरती रद्द करावी मात्र नियमित पशुवैदयकीय उपचार सेवा आम्ही देत राहू असेही या संघटनेने कळविले आहे.