युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची युवक काँग्रेसची मागणी

जनदूत टिम    11-Sep-2020
Total Views |
पालघर : सध्या बेरोजगारी मुळे त्रस्त असलेल्या युवकांना रोजगार दो या मागणीसाठी पालघर जिल्हा युवक काँग्रेस व वसई विरार जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा अधिकारी पालघर व तहसीलदार वसई यांना निवेदन देण्यात आले.
 
Job_1  H x W: 0
 
युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले. या नॉटबंदी मुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला, वस्तू सेवा कराच्या चुकीच्या अमलबजावणीमुळे या क्षेत्राचे कंबरडे मोडले.त्यानंतर कोरोना महामारीमुळे , लादलेल्या लॉकडाऊनमुळे १२ ते १३ करोड लोक बेरोजगार झाले. सी.म.आय.सी च्या पाहणीतून समोर आले आहे.जीडीपीचा दर शून्याखाली घसरून २३.९ टक्यांनी घसरल्याने समोर आले आहे.बेरोजगरीमुळे अनेक कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे .
 
या करिता मोदी सरकारकडे पालघर जिल्हा युवक काँग्रेस व वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस तर्फे 'रोजगार दो' मागणिकरिता जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर वसई विरार जिल्हाचे युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वर्तक , यांनी निवेदन जिल्हा अधिकारी यांना संपूत केले. यावेळी पालघर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राठोड जिल्ह्याचे सरचिटणीस फेलिक्स पांगे, प्रतीक वर्तक, नालासोपरा युवक काँग्रेसचे कोवाल , विरार युवक काँग्रेसचे मोसीम शेख , क्रिस्टल नाडर, कलाम शेख आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.