आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या सुचनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

जनदूत टिम    07-Aug-2020
Total Views |

- कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय (21-12-19)

मुंबई : रक्ताच्या नातेवाईकाला घर अथवा फ्लॅट विकायचा असेल किंवा हस्तांतर करायचा असेल तर त्यावर संपूर्ण स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण व लोकप्रिय निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता फक्त 500 रूपयां च्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मालमत्ता हस्तांतरित करता येईल.  
 
Bacchu-Kadu-1_1 &nbs
 
सध्या नातेवाईकांना घर, फ्लॅट हस्तांतर करताना मालमत्तेच्या सरकारी किंमतीवर 5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.ग्रामीण भागात घरकुल च्या लाभाकरिता जागा नावावर असणे ही महत्त्वाची अट होती व कुटुंबातील इतरांच्या नावावर जरी जागा असली तरी लाभार्थी ला त्याचा उपयोग होत नव्हता त्याकरीता खरेदी हाच एकमेव उपाय होता.नव्या नियमानुसार, वडिलांकडून मुलगा, मुलीच्या नावावर तसेच मुलांकडून आई – वडिलांच्या नावावर, भाऊ – भाऊ व भाऊ बहिणीच्या नावावरील स्थावर मालमत्ता केवळ 500 रूपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हस्तांतर करता येणार आहे.
 
दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयामुळे रक्ताच्या नातेवाईकाला मिळकत हस्तांतरित करणे अधिक सुकर होणार आहे.राज्य शासनाने स्थावर मालमत्तेच्या मालकी हस्तांतरण व विक्री बाबतच्या नियमांत बदल केले आहेत. त्यात रक्ताच्या नात्यातील मिळकतीवरील हस्तांतरण करताना संपूर्ण स्टॅम्प ड्युटी रद्द करण्यात आली आहे. मात्र, सरकारी नियमानुसार कोणत्याही व्यवहाराबाबत व अदलाबदलीसाठी 500 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरण होईल.
 
सरकारी किंमती नुसार एखाद्या घराची, फ्लॅटची 20 लाख रूपये किंमत असेल तर 1 लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मुंबईत तर 1 कोटींचा फ्लॅट खरेदी केला तर संबंधितांना 5 लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळेच कुटुंबातील व रक्तातील व्यक्तीच्या नावावर घर करायचे झाल्यास नागरिकांना फायदा होणार आहे.