कोविड सेंटर व व्यापारी व नोकरदार यांच्या समस्या निवारणसाठी शहापूर निवासी कुणबी समाज मंडळाचे आमदारांना निवेदन !

जनदूत टिम    04-Aug-2020
Total Views |
वासिंद : कोविड सेंटर मधील व लॉकडाऊन काळात व्यापारी व नोकरदार यांच्या समस्या निवारणासाठी शहापूर निवासी कुणबी समाज मंडळानी पुढाकार घेऊन स्थानिक आमदार यांच्या कडे निवेदनाद्वारे समस्या सोडविण्याची मागणी केली.
 
Kunbi Samaj_1  
 
कोविड सेंटरमधील निकृष्ट भोजन, सडलेली फळे याबाबत संबंधित ठेकेदार व निरीक्षकांना सक्त ताकीद द्यावी तसेच लॉकडाऊन काळात व्यापारी व नोकरदार यांचा रोजगार बुडून ते आर्थिक संकटात असल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल व गाळा भाडे माफ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी शहापूर निवासी कुणबी समाज मंडळातर्फे आमदार दौलतजी दरोडा यांना निवेदन देत समस्या मांडल्या. सदर याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेण्याचे आश्वासन आमदार दरोडा यांनी दिले असल्याचे मंडळाचे सचिव भानुदास महाराज भोईर यांनी सांगितले.
 
यावेळी निवासी मंडळाचे अध्यक्ष अनिलजी निचिते, कार्याध्यक्ष मधुकरजी शिंदे, उपाध्यक्ष रोहिदासजी गोदडे, उपाध्यक्ष दिनेशजी घरत, सचिव भानुदास महाराज भोईर व माधवजी भेरे उपस्थित होते.