शहापुर तालुक्यातील वासिंद जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना झिरो मिशनकडे यशस्वी वाटचाल

जनदूत टिम    26-Aug-2020
Total Views |
वासिंद : वासिंद शहरात शासकीय आरोग्य विभागामार्फत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके व डॉ विनय देवलालकर तसेच ग्रामपंचायतिच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर वासिंद जिल्हा परिषद शाळा येथे सुरू करण्यात आले होते. या शिबिरात वासिंद परिसरातील लाभ ५२ नागरिकांनी लाभ घेतला तसेच , कोरोना टेस्ट ला येतांना आधार कार्ड, रेशन कार्ड आणणे अनिवार्य होते. आपल्या व आपल्या परिवारासाठी सुरक्षिततेच्या हेतूने ही टेस्ट जरूर करा असे आव्हान आरोग्य विभागामार्फत डॉ तरुलता धानके यांच्या कल्पनेतून करण्यात आले आहे.
 
corona_1  H x W
 
वासिंद कोरोना मिशन - ० साठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . तरुलता धानके , आमदार दौलत दरोडा व त्यांचे कार्यकर्ते ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे,ग्रामपंचायत सरपंच सौ.लता शिंगवे व सदस्य,जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य केले. या सोबत वासिंद शहरातील राजेश निकम ,माजी आमदार पांडुरंग बरोरा व त्यांचे कार्यकर्ते,महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर उपाध्यक्ष कल्पेश शेलार , आर पी आय शहर अध्यक्ष प्रवीण गायकवाड, भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष अनिल शेलार व बाळा सोगले ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप पाटील ,निशिकांत शेलार व महिला अध्यक्षा रजिता दुपारे ,शिवसेना शहर अध्यक्ष विकास शेलार,दत्ता ठाकरे ,तसेच बहुउद्देशीय आरोग्य सेवक निलेश वेखंडे, कमलाकर घरत,दीपक पष्टे,युवराज गभाले ,राजाराम कांबळे, संतोष घरत व आशा कार्यकर्त्या व इत्यादी कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली. परंतु आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार निलिमा सूर्यवंशी व गटविकास अधिकारी भवारी यांनी शिबिरासाठी पाठ फिरवली असता त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाराजी पसरली आहे.