वासिंद रेल्वे स्थानकला थांबा मिळावा मुख्यमंत्र्यांना निवेदन

जनदूत टिम    26-Aug-2020
Total Views |
वासिंद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा मुंबईत अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सुरू करण्यात आली परंतु वासिंद रेल्वे स्थानकाला या सेवेतून वगळण्यात आले.
 
Vasind_1  H x W
 
या स्थानकात लोकल न थांबता ती आसनगाव या स्टेशनला थांबते परिणामी वासिंद स्थानक मधून मुंबईत अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.मुंबईकडे कामाला जाणारी शेकडो कर्मचारी वर्गाला आपल्या कामावर जाण्यासाठी आसनगाव स्टेशन गाठावे लागते किंवा महामार्गावर येऊन मिळेल त्या वाहनांनी आपल्या सेवेवर रुजू होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
मुंबई किंवा उपनगरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां पैकी शेकडो महिला आहेत त्यांनी रेल्वेच्या या निर्णयामुळे नाराज झाल्या असून त्यांची खूप गैरसोय होत आहे असे कल्याण -कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन कडे या बाबत तक्रार केली असता या बाबत शासनाने याची दखल घेणे व रेल्वेच्या अधिकारी वर्गाने या बाबत त्वरित कार्यवाही करावी या साठी आज कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन चे कार्याध्यक्ष डॉ.मनोहर सासे व वासिंद रेल्वे स्थानक प्रतिनिधी मुकेश दामोदरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव जी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच मुंबई विभाग रेल्वे प्रबंधक आणि वासिंद रेल्वे उप स्टेशन प्रबंधक भदोरीया यांच्याकडे निवेदन देण्यात आले सदर निवेदन देण्यासाठी सदस्य बाळाराम शेलार, दिलीप गव्हाळे आदी मंडळी उपस्थित होते.