सरकारी अन्नधान्य आल्या बाजारात परस्पर विकणारा रेशनिंग माफिया लखन उर्फ लक्ष्मण चंद्र पटेल

जनदूत टिम    20-Aug-2020
Total Views |
पनवेल : काही दिवसा पूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सदरहू आरोपीवर धान्य काळा बाझार करत असल्याने गुन्हे दाखल झाले होते व सदरहू तपास अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्या दृष्टीने तपास यंत्रणा फिरवली व सदरहू आरोपीवर सोलापूर,नाशिक,पडघा व महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाहाल असल्याचे उघड झाले आहे..
 
Patel_1  H x W:
 
नाशिकच्या वाडिवरे पोलीस ठाण्यात व पनवेल शहर पोलीस ठाण्यात सदरहू आरोपीवर मकोका प्रमाणे गुणही दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या हा आरोपी पनवेल शहर पोलीस ठाण्यातून फरार आहे सदरहू आरोपीने धान्याची काळा बाजारी व सरकारी धान्य हे परस्पर विक्री करून त्यातून १००० कोटींच्यावर प्रॉपर्टी बनवली आहे सदरहू बाबत अंमलबजावणी संचालनालय ह्यांच्याकडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी व काळा बाजारी करून कमावलेली संपूर्ण प्रॉपर्टीवर जप्त करण्यात यावी फक्त पडघा येथे सदरहू आरोपीस ९१ लाखाच्या धान्याची कला बाजारी करते वेळेस पकडण्यात आले होते व सदरहू धान्यमाल हे जप्त करण्यात आले तसेस पनवेल शहर पोलीस ठाण्यात हि इतक्याच धान्य मालाची काळा बाजारी करते वेळेस पकडण्यात आले होते पण आरोपी हा त्यातून फरार झाला आहे सदरहू आरोपीचे व्यवसाय कार्यालय शहाड येथे असून ह्या आरोपीने संपूर्ण महाराष्ट्रा,कर्नाटक व इत्तर राज्यात आपल्या काळ्या बाजाराचे धागे-दोरे पसरविले आहेत व ह्यातूनच त्याने जवळ-जवळ १००० कोटीची माया जमवलेली आहे.
आपल्याला ऐकायला व बोलायला सोप्पं जात कि काळा बाजारी पण कित्येक लाखो गोर-गरिबांच्या तोंडातला घास काडून ह्याने आपली हि संपत्ती जमवली आहे एकीकडे संपूर्ण देश महामारीशी लढत आहे.
 
गोर-गरिबांना मदत होईल ह्याची काळजी घेत ह्यात महाराष्ट्रातले आपले पोलीस प्रशासन पण एकवटून ह्या गरीबांना होईल तितकी मदत करत आहेत व त्यातच हा लखन पटेल ह्याच गोर-गरिबांच्या तोंडातला घास कडून आपली तिजोरी भरत आहे सदरहू आरोपीवर देशाची संपत्ती हानी करून काळ्या बाजारी प्रकरणी कडक शासन करून त्याची संपूर्ण संपत्ती जप्त करून त्याच्यावर अधिक वाढीव कल म महामारीच्या विभिन्न कलम अंतर्गत कारवाई करून जेर बंद करण्यात यावे हि विनंती मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) मा पोलीस महासंचालक सो (महाराष्ट्र राज्य)
ह्यांच्या माहितीसाठीण.