बारवीचे पाणी पुन्हा पेटले,प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण

जनदूत टिम    20-Aug-2020
Total Views |

- जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली भेट

मुरबाड: मुरबाड-बारवी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता बेकायदेशीर धरणाची उंची वाढवून अनेक गावे व पाड्यांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी चर्चा करूनही एमआयडीसी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या काही पदाधिकाऱ्यांनी (१९ ऑगस्ट) रोजी उपोषण सुरू केले आहे.
 
Uposhan_1  H x
 
या उपोषणाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांसह रामभाऊ दळवी,माजी उपसभापती अनिल देसले,मोहन भावार्थे, चंद्रकांत बोष्टे आदींनी भेट दिली. बारवी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या सरसकट खावटी चाटप त्वरीत झाले पाहिजे,नोकऱ्यांचे नियुक्त आदेश लवकरात लवकर मिळाले पाहिजे,काही प्रकल्पग्रस्तांच्या घराचा राहिलेला मोबदला मिळाला पाहिजे,भूखंडाचे पेमेंट वाटप,संपादित न केलेल्या जमिनीवर धरणाचे पाणी बसलेले आहे त्या शेतकयांना नुकसान भरपाई देवून वरील जमीन भुसंपादित करून पेमेंट देण्यात यावे,पाण्याच्या साठ्यामुळे ज्या जमितीत शेतकरी पिक घेवू शकत नाहीत त्या जमिनी संपादित करून पेमेंट करण्यात यावे,काही घराचे मोजमाप झाले असून मुल्यांकन यादीत दिसून येत नाही त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, सर्व नवीन गावठाणामध्ये सामाईक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,सन २००२ ते आजपर्यंत काही जमिनीचे पेमेंट बाजार भाव ठरवून आजपर्यंत झालेले नाही,आजपर्यंतची तफावत देण्यात यावी,कलम ३५ सेक्शनच्या जमिनींचे सर्व शेतकयांना पेमेंट करण्यात यावे,शेतघराचे मुल्यांकन करून पेमेंट करण्यात यावे.
 
बारवी धरण टप्पा क्र .१ मधील ३४ प्रकल्प ग्रस्तांच्या मुलांना मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमल बजावणी करून नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे,ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घराचे मुल्यांकन शुन्य आले आहे त्याचे फेरमुल्यांकन करून पेमेंट करण्यात यावे,बुडीत क्षेत्रातील जमिनीवरील झाडोऱ्याचे पेमेंट करण्यात यावे,तळ्याची वाडी व देवराळवाडी या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे,बारवी धरणामध्ये बाधित होणाऱ्या सर्व प्रकल्प प्रस्तांच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे.यावेळी प्रकलग्रस्त समितीचे कमलाकर भोईर,हरेश भोईर,चंद्रकांत बोष्टे,संतोष चौधरी, परेश कडव,भास्कर खंडागळे,दीपक भोईर,गोविंद गोरड,लक्ष्मण खोडका, शनील कोळेकर आदी सहभागी होते.