वासिंद मधील सावरकर नगर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सारा फौंडेशनच्या वतीने मंसुरा काढा पुढयांचे वाटप

जनदूत टिम    17-Aug-2020
Total Views |
वासिंद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि परिस्थिती चिंताजनक होत आहे अशावेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सारा फाउंडेशन तर्फे श्री विजय खरे,प्राध्यापिका सुनित्रा खरे मालेगाव येथील सुप्रसिद्ध मंसुरा काढ्याचे मोफत वाटप आज सायंकाळी साडेपाच वाजता श्री ऑनलाईन येथे वाटप करण्यात आले.
 
Vasind_1  H x W
 
या काढ्याचे वाटप शहापुर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विनय देवळालकर,डॉ कुंदन वारघडे, वासिंद पोलीस स्टेशनचे ए पी आय योगेश गुरव यांच्याकडून सावरकर नगर मधील स्थानिकांना वाटप करण्यात आले.
 
त्यावेळी वासिंद शिवसेना शहर प्रमुख विकास शेलार, उद्योजक दत्ता ठाकरे, प्रकाश वाघमारे, महेंद्र शिर्के, स्वप्नील भानुशाली, बाबू गोस्वामी, स्वप्नील गोधडे , श्री ऑनलाईन चे मालक निलेश आंबोवणे तसेच वासिंद सावरकर नगर मधील रहिवासी उपस्थित होते.