शहापुर तहसिलदारांविरोधात पत्रकार एकवटले

जनदूत टिम    13-Aug-2020
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यातील तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी केली असून तालुक्यातील जनतेमध्ये सुद्धा त्यांच्या मनमानी कारभाराबाबत उद्रेक होताना दिसत आहे. दरम्यान शासनाने त्यांची बदली येत्या १४ ऑगस्ट पर्यत न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पत्रकार साखळी उपोषण करणार असल्याचे पत्रकारानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
Press_1  H x W:
 
शहापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढत आहेत. शहापूर तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सोशल मीडियावर आपत्ती व्यवस्थापन बाबत उद्रेक होत आहे. त्यातच तालुक्यातील समाज सेवक व पत्रकार वर गुन्हे दाखल होत असून अनेक पत्रकाराना तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी धमक्या दिल्या असून याबाबत तक्रारी दाखल केलेल्या आहेत . यामुळे शहापूर तालुक्यातील पत्रकार संघटना व दैनिक , साप्ताहिक , इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आक्रमक झाले असून त्यांनी नुकतीच एक बैठक आयोजित करून याबाबत बदलीसाठी निवेदन तयार केले आहे.शहापूर तालुक्यात या सर्व गोष्टी मुले अराजकता पसरली आहे. शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांनी शहापूर च्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांची बदली करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे यापूर्वीच केली आहे.
 
यापूर्वी सुद्धा महसूल विभागातर्फे अनेक नागरिकांवर गौण खनिज उत्खनना बाबत खोटे गुन्हे दाखल झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मुख्य म्हणजे शहापूर तालुक्यात कोरोना मुले मृत्यूचे प्रमाण वाढले असून याबाबत सातत्याने नातेवाईकांकडून प्रशासनाला जबाबदारी धरले आहे. महसूल विभागातील तहसीलदार च्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची कामे होत नसल्याचा तक्रारी यापूर्वी नागरिकांनी केल्या आहेत. त्यातच तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या मधील वाद मागील घटनेनुसार विकोपाला गेल्याचे दिसून आल्याने महसूल विभागात ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे.
 
या सर्व कारणांमुळे शहापूर तालुक्यातील तहसीलदारांची बदली करण्याची मागणी शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , महसूल मंत्री, पालकमंत्री यांना इमेल द्वारे पत्रव्यवहार केला आहे. सदर तहसीलदार ची बदली येत्या १४ ऑगस्ट पर्यत न केल्यास येत्या १५ ऑगस्ट पासून शहापूर तालुक्यातील पत्रकार तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी ११ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. शहापूर तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक , इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पत्रकार एकवटले असून तहसीलदारांचा मनमानी कारभाराबाबत लोकशाही मार्गाने आंदोलनात उतरले आहेत. दरम्यान तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष पदाधिकारी यांचा पाठिंबा त्यांना सोशल मीडियावर दिसत असल्याने बदली बाबत शहापूर तालुक्यात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
 
पत्रकारांच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा
तहसीलदारांच्या विरोधात १५ ऑगस्टपासून होणार बेमुदत साखळी उपोषणशहापुरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी या आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असल्याने कोविड काळात सुयोग्य नियोजन करून अंमलबजावणी करणे त्यांची मुख्य जबाबदारी आहे. पण आपल्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय नसल्याने, मनमानी स्वभावामुळे तसेच नियोजनशून्य कारभारामुळे शहापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढत गेली. सातत्याने त्यांच्याविरोधात येणाऱ्या तक्रारी बघता आमदार दौलत दरोडा यांनी तहसीलदारांची बदली करण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत धाव घेतली. पण त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आले नाही. इतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पुढाऱ्यांनीही पाहिजे तशी आक्रमक भूमिका घेतली नाही. त्यातच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधीक्षक डॉ. बनसोडे यांना जाब विचारायला गेल्या राजकीय, सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील व्यक्तींवर बनसोडे यांनी गुन्हे दाखल करूनही कुणीही पाहिजे तशी ठोस भूमिका घेतली नाही. लोकप्रतिनिधी आणि इतर पुढारी यांचा काहीही दबाव नसल्याने तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराला वैतागून शहापूर तालुक्यातील पत्रकांनी एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी स्वातंत्र्यदिनापासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतीत योग्य नियोजनसुद्धा झालं आहे.येत्या १५ ऑगस्टपासून होणाऱ्या या उपोषणाला पत्रकार, पत्रकार संघ, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच वैयक्तिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे तहसीलदार यांच्या विरोधातील हे पत्रकारांचे उपोषण आताच जोमाने पेट घेत असल्याचे चित्र दिसत आहे.