शहापूर - मुरबाड रस्त्याबाबत आमदार दरोडांचे पालकमंत्र्यांना पत्र

जनदूत टिम    10-Aug-2020
Total Views |
शहापूर : शहापूर - मुरबाड रस्त्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता तसेच रस्त्यात जमीन हस्तांतरित होत असल्याने शेतकऱ्यांचा वाढता विरोध बघून शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदें यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.

daulat daroda_1 &nbs 
 
शहापूर - मुरबाड रस्ता ठेकेदारांच्या विलंबामुळे पूर्ण होऊ शकला नसल्याने वाढलेले अपघात आणि लोकांच्या तक्रारी वाढल्याने हा रस्ता चर्चेचा विषय बनला आहे .या रस्त्यामधील येत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून योग्य मोबदला मिळावा तसेच या रस्त्याची अंदाजपत्रकिय माहिती मिळावी याबाबत आमदार दौलत दरोडा यांनी पालकमंत्री यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे .तसेच हा रस्ता लवकरात लवकरात पूर्ण करून तेथील सर्व अडथळे दूर करावे या साठी पालकमंत्र्यांच्या दालनात तातडीची बैठक करण्यात यावी संबंधित यंत्रणेला या बैठकीला बोलावून शहापूर - मुरबाड रस्त्याची समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे .