स्तनदा माताना बेबी केअर किट वाटप व्हावे!

उमेश मारुती भेर    10-Aug-2020
Total Views |

- लॉकडाऊनमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना आणखी एक विनंती

ठाणे : कोरोनाचे संकट गेले पाच महिने माथ्यावर घेऊन प्रत्येकजण जगत आहे .रोजगाराची सर्व साधने बंद झाल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे .ठाणे - पालघर जिल्ह्यात दुर्गम भागांत तर आर्थिकदृष्ट्या खच्चीकरण झाल्याने जीवनावश्यक वस्तू मिळणे ही कठीण झाले आहे .
 
Baby Care Kit_1 &nbs
 
काही सामाजिक संस्था ,सामाजिक आणि राजकीय नेते तसेच सामान्य माणसेही सामाजिक भान ठेऊन गरिबांना मदतीचा हात म्हणून पुढे आली आहेत . ग्रामीण भागांत गरिबीमुळे नवजात बालकांची निगा राखणे तसेच बालकांची जोपासना करणे ही कठीण होत असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .त्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवक व संस्थांनी इतर कोणत्याही जीवनावश्यक मदतीसोबत गरजू कुटुंबामधील स्तनदा माताना बेबी केअर किट चे वाटप व्हावे अशी अपेक्षा आहे.
 
ग्रामीण भागांत बालकांची जोपासना योग्य रीतीने झाली नाही तर बालकांची वाढ होण्यास अडथळा येतो .बालकांची चांगल्या प्रकारे निगा राखण्यासाठी आवश्यक क्रीम, मसाज करण्यासाठी लागणारे तेल, पावडर किंवा अन्य काही आवश्यक वस्तूंची उणीव असल्याने बालकांची निघा राखणे अवघड जात आहे .तरी हे आवश्यक बेबी केअर किट सामाजिक संघटना किंवा समाजसेवकानी बेबी केअर किटचे वाटप केल्यास बालक आणि स्तनदा माताना उपयोग होऊ शकेल .  
 
नवजात बालकांना विविध आजार, त्वचा विकार, हात पायांची मसाज अभावी खुंटलेली शारीरिक वाढ या समस्या असताना पैशांअभावी त्यावर उपाय करणे कठीण असताना कोरोना काळात मिळालेली मदत खूप मोठा हातभार लावणारी ठरणार आहे .