खुप जास्त वेळ बसुन काम केल्यानं 'हे' 8 गंभीर आजार होऊ शकतात

जनदूत टिम    09-Jul-2020
Total Views |
जर तुम्हाला खुपवेळ एकाच ठिकाणी बसून काम करावे लागत असेल तर ही बातमी जरूर वाचावी. खुपवेळ बसून राहिल्याने तुम्ही निष्क्रिय होता, तुमच्या शरीरातील काही भागच काम करतात. यामुळे कँसरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका जास्त वाढतो.
 
Work_1  H x W:
 
एक गोष्ट हीदेखील आहे की, कँसरच्या ज्या ८० टक्के रूग्णांचा मृत्यू होतो, त्यांचा जास्त वेळ बसण्याशी काही संबंध नसतो. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. यासोबत या अभ्यासात हेदेखील आढळले की, जर तुम्ही मध्येच उठता, फिरता आणि हळुहळु काही मिनटांसाठी एक्सरसाईज करता, तर तुम्हाला कँसरचा धोका राहात नाही. जे लोक खुपवेळ पर्यंत बसून काम करतात, त्यांच्यासाठी हे संशोधन डोळे उघडणारे आहे.
 
हाय ब्लड प्रेशर
जास्तवेळ बसल्याने विविध भागांचे नुकसान होते. उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. कोलेस्ट्रॉल वाढते. अजिबात नाही किंवा खुप कमी बसणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त बसणाऱ्या लोकांना हे आजार होण्याचे प्रमाण दुप्पट आहे.
 
कोलोन कँसरचा धोका
अनेक संशोधनातून हीदेखील शक्यता समोर आली आहे की, जास्त काळ बसून राहिल्याने कोलोन कँसरला सुद्धा आमंत्रण मिळते. एवढेच नव्हे, स्तन आणि एन्डोमेट्रीअल कँसर होण्याचा धोकासुद्धा वाढतो.
 
स्नायूंमध्ये कमजोरी
जेव्हा आपण कोणतीही क्रिया करत असतो किंवा उभे राहून काम करतो तेव्हा स्नायू सक्रिय राहतात, परंतु जास्त वेळ बसल्याने पाठीचे आणि पोटाचे स्नायू ढिले पडू लागतात. या स्थितीमुळे नितंब आणि पायांचे स्नायू कमजोर होतात. एकाच स्थितीत ताठ न बसल्याने मणक्यावरहीपरिणाम होतो.
 
ऑस्टिओपोरोसिस
एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने वजनही वाढते. परिणामी नितंबाची हाडे आणि मागील काही हाडे कमजोर होतात. शारीरिक हालचालीअभावी ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होतात.
 
मेंदूवर परिणाम
जास्त वेळ बसून काम केल्याने मेंदूवरही परिणाम होतो. मेंदूचे कार्यही अस्पष्ट आणि मंद होते. स्नायूंच्या सक्रियतेमुळे मेंदूतपर्यंत ताजे रक्त आणि ऑक्सिजन पोहचते, जे मेंदूत रसायने तयार करते. परंतु तसे न केल्यास मेंदूच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
 
निष्क्रियता आणि बसून राहणे आजाराचे कारण
संशोधनानुसार दीर्घकाळ बसून काम करणे याचा हृदयरोग, टाइप २ मधुमेह, लठ्ठपणा आणि अकाली मृत्यूशी संबंध आहे. काही अभ्यासांमध्ये निष्क्रियता आणि कर्करोग यांचाही संबध दर्शवला गेला आहे, परंतु हे संशोधन अनेकांना विश्वासार्ह वाटले नाही.
 
संशोधन प्रकाशित झाले
यासंदर्भात एक नवीन रिपोट तयार करण्यात आला आहे. याचे प्रकाशन जूनमध्ये जामा (जामा) ऑन्कोलॉजीमध्ये झाले होते. यासाठी ह्यूस्टनमध्ये एमडी अँडरसन टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सर सेंटर आणि देशभरातील इतर संस्थांच्या संशोधकांनी देशव्यापी अभ्यास करून डेटा गोळा केला होता. आता या डेटाची पुन्हा तपासणी केली जाईल. या अभ्यासात ३०,००० हून अधिक मध्यमवयीन पुरुष आणि स्त्रियांच्या गटाला समाविष्ट करण्यात आले होते. सन २००२ हा अभ्यास सुरू करून आरोग्य, जीवनशैली आणि वैद्यकीय स्थितीविषयी माहिती गोळा केली गेली.
 
ट्रॅकर घालून केला अभ्यास
यातील काहींनी एक आठवड्यासाठी हालचालीची नोंद घेणारे ट्रॅकर घालण्याची सहमती व्यक्त केली, हे ट्रॅकर घातल्याने ते कितीवेळ सक्तीने बसले आणि उठले, समजू शकले. आता संशोधकांनी सुमारे ८,००० लोकांचा रेकॉर्ड एकत्र केला आहे. ज्यांनी काही काळ ट्रॅकर घातला होता. हे पुरूष आणि महिला सुमारे ४५ वर्षांचे होते, जेव्हा ते अभ्यासात सहभागी झाले, तेव्हा त्यांचे आरोग्य चांगले ते ठिक असे होते. काही जास्त वजन, धुम्रपान करणारे, मधुमेही किंवा उच्च रक्तदाबाच्या स्थितीत होते.
संशोधकांनी या लोकांच्या हालचालींची ट्रॅकरद्वारे तपासणी केली. यावरून ते किती वेळ एकाच ठिकाणी बसतात हे समजले. एका गटाने सुमारे १३ दिवस एक खुर्चीवर निष्क्रिय रूपाने घालवले होते. तर काही लोक फिरणे, घराच्या बाहेर पडणे आणि बागकाम करणे किंवा व्यायाम करणे अशी हलकी कामे करत असल्याचे दिसून आले.
 
थोडीतरी एक्सरसाइज करणे आरोग्यासाठी चांगले
एमडी अँडरसन कँसर सेंटरचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुसान गिलक्रिस्ट यांनी म्हटले की, या आकड्यांवरून समजते की, अगदी कमी प्रमाणात जरी शारीरीक हालचाल केली तरी कँसरपासून वाचण्यासाठी ती लाभदायक ठरू शकते. हा रिसर्च दगडावरील रेषेसारखा नाही, तर यातून हे समजते की, जास्त वेळ बसल्याने निष्क्रियता झाल्याने शरीर शिथिल होते.
यामुळे आजार वाढण्याची शक्यता वाढते. याच्या उलट जर आपण चालत राहीलो, काही हलके फुलके व्यायाम केले तर आजार होण्याची शक्यता कमी होते. गिलक्रिस्ट म्हणाले, ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भविष्यातील अभ्यासात त्या काही मुद्द्यांवर तपास करण्याची अपेक्षा आहे.