महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन

जनदूत टिम    07-Jul-2020
Total Views |

- बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे होम क्वारंटाईन झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने थोरात होम क्वारंटाईन झाले आहेत.
 
Balasaheb-Thorat-2_1 
 
बाळासाहेब थोरात यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट अजून प्रलंबित आहे. बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीसाला कोरोनाची लागण झाली होती. काहीदिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा ताफ्यातील पोलीस आणि त्यांच्या वाहन चालकालाही कोरोनाची लागण झाली होती.
 
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक प्रयत्नही करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राजकीय मंडळी घरातून बाहेर पडताना काळजी घेत आहेत.
दरम्यान, यापूर्वी राज्यातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झालेली. हे तिन्ही मंत्री कोरोनावर मात करत आपल्या घरी परतले आहेत.