अखेर जिंदालच्या विषारी पाण्याने मासे मारायला सुरुवात माणसांचा नंबर कधी?

जनदूत टिम    05-Jul-2020
Total Views |
शहापूर : शहापुर तालुक्यातील वासिंद ग्रामपंचायत हद्दीतील नावाजलेली जिंदाल स्टिल कोटेड प्रा.लि. या कंपणीच्या आतुन वाहत येनार्या नाल्या मार्फत विषारी रसायने वाहुन येत आसल्यामुळे सारमाळ नदी पात्रातील शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची तक्रार पाली ग्रामस्थांनी केली आहे. शहापुर तालुक्यातील वासिंद, साने पाली, सारमाळ ग्राम पंचायत हद्दी मध्ये जिंदाल उद्योग समुहाची जिंदाल स्टिल कोटेड या नावाने पत्रे व लोखंडाच्या मोठ्या शिट तयार करनारा कारखाना उभारन्यात आला आहे. सुरुवाती पासुनच हा कारखाना वादग्रस्त राहीला असुन, आता नव्यानेच या कारखान्या शेजारीच नवा कारखाना उभारन्याचे काम सुरु आहे.
 
Bhiwandi Fish_1 &nbs
 
या कारखान्यात लोखंडी पत्र्यांची निर्मिती केली जानार आसुन या पत्र्यांवर रंग देन्यासाठी आनेक रासायनिक प्रक्रीया करण्यात येनार आसल्याने यावर स्थानिक ग्रामस्तांनी अक्षेप घेवुन या कारखान्याला परवानगी देवु नये म्हणुन अनेक अंदोलने व ठराव आणि पत्रव्यावहार केला गेलेला होता. परंतु त्याची कोणतीही दखल न घेता सदर बांधकामाला परवानगी दिली होती. या प्लॅन्टचे बांधकाम करतांना या कंपणीने हजारो ब्रास माती उत्खनन करून भराव केला आसुन शासनाची फसवनुक करुन काही शेकडो ब्रासची राँयल्टी बुडवली आसल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
 
अखेर दोन दिवसा पुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिंदाल कंपणीतुन वाहनार्या नाल्यातुन विषारी रसायने सोडली गेल्याने सारमाळ नदीतील आनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत ही बाब लक्षात येताच काही पर्यावरण प्रेमी नागरीकांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आनुन दिली आसुन ही बाब गंभिर आसल्याचे समजते कारण हे विषारी रासायनिक द्रव्य सारमाळ ओहोळातुन वाहुन थेट भातसा नदीत मिसळते त्यामुळे नदीतील पाणी दुषीत होते. परीनामी भातसा नदीच्या लगत आसनार्या खडवली, कांदळी, कळंबोली, बेहरे, वांद्रा,आशा गांवांना या नदीतुनच पाणी पुरवठा होत आसल्याने साथीचे रोग बळवन्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या नदीचा पाणी अनेक जनावरे पित आसुन त्यांना ही बाधा होत आसल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हनी होत आहे.त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभिर दखल घेवुन कारवाई करणे गरजेचे आहे.आशी मागणी तालुक्यात जोर धरीत आहे.