शहापुर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या सहविचार बैठका ?

जनदूत टिम    05-Jul-2020
Total Views |
शहापूर : शहापूर  तालुक्यात फेल झालेले आपत्ती व्यवस्थापन आता सहविचार बैठका सुरु केल्या आहेत. यातील एक बैठक वासिंद शहरातील वाढत्या कोरोना रुग्णामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.यावरील उपाययोजनेसाठी शहापुर तहसीलदार निलिमा सुर्यवंशी यांनी वासिंद येथे बैठक घेण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके यांचा समावेश न करून घेता मॅसेज देण्यात आले.
 
Shahapur_1  H x
 
विशेष म्हणजे या बैठकीला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा निरोप देण्यात आला नंव्हता हि कोणत्या बैठकीचा भाग होता असे तहसीलदार यांना नागरिक विचारीत आहेत. तसेच ग्रामस्थांना बैठकीचे निवेदन व कोणत्याही प्रकारचे मेसेज देण्यात आले नाही याचाच अर्थ असा की त्या आपत्ती व्यास्थापनात तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा स्थानिक वैद्यकीय अधिकारी मोडत नाहीत असा करून घ्यायचा का असे विविध प्रश्न कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण झालेल्या वासिंदच्या नागरिकांना पडला आहे. तरीही ऐकीव माहितीवर आरोग्य अधिकारी सभेला उपस्थित राहिले.
अधिकाऱ्यांमध्ये जर समन्वय आहे तर तहसीलदार मॅडमनी स्वतःसोबत आरोग्य अधिकार्‍यांना का आणले नाही.? कोरोणाची सभा आरोग्य अधिकाऱ्यांशीवाय पूर्ण होऊ शकते का? तालुक्याला असे भासवायचे होते की वाशिद मध्ये मीटिंग लावून सुद्धा आरोग्य अधिकारी अनुपस्थित राहिले. हा तहसीलदार मॅडम बनाव आरोग्य खात्याला बदनाम करण्याच एक षडयंत्र रचत असल्याचे स्पष्ट दिसत होते.
याचवेळी बैठकीत उपाययोजना ठरविण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे
1)घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण करणे.
2)रस्त्यावर भाजीपाला व इतर विक्रेत्यांना ग्रामपंचायत मार्फत स्यानिटायझर पुरविणे.
3)ज्या व्यक्ती मास्क घालणार नाही त्यांच्यावर दंड ठोठावणे.
4)जे दुकानदार अत्यावश्यक सेवेमध्ये येणार नाहीत त्यांची दुकाने चालू राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करणे.
5)प्रशासनाने दुकानदारांची जी वेळ ठरविली आहे त्याच वेळेत दुकाने बंद न केल्यास त्यांच्यावर सक्तीची कारवाई करणे.
आदी निर्णय घेण्यात आले.
जर ह्या उपाययोजना आपण निश्चित पणे पार पाडल्या तर कोरोना आटोक्यात येईल तसेच वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात फिव्हर क्लिनिक सेंटर चालू करण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत ते चालू केल्याने अतिशय प्रमाणात रुग्णांना आटोक्यात आणता येईल असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.याचवेळी तहसीलदार निलिमा सुर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके विस्तार अधिकारी महाले,पोलीस पाटील,मंडळ अधिकारी,जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव,ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.लता शिंगवे,उपसरपंच फुलवंती कंठे व सद्यस्य काळुराम पवार,वासुदेव कठोळे,विलास पाटील, विनोद म्हसकर, ग्रामसेवक ए. जे.थोरात ,पंचायत समिती सदस्य सौ.संजीवनी कोचुरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके,वैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र पवार,एम.पी डब्लू गबाले,व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे व सर्व सद्यस्य, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.. -