सदगुरु श्री. साईबाबांना पूर्णतः समर्पित एकमात्र टीव्ही चॅनेल साई लीला

जनदूत टिम    05-Jul-2020
Total Views |
सद्गुरू श्री. साईबाबांना पूर्णतः समर्पित टीव्ही चॅनेल असावे, अशी करोडोसाईभक्तांची अनेक वर्षां पासून इच्छा होती. ज्यामध्ये श्री. साईबाबांची शिकवण व तत्वज्ञान सोप्या भाषेत सर्वसामन्यानंपर्यंत पोहचू शकेल. यासाठी श्री. साईनाथांच्या कृपने आम्ही काही साईभक्तांनी 'साईलीलाटीव्ही' चॅनेल ची सुरुवात केली आहे.
 
sai lila_1  H x
आजच्या काळात भडक मनोरंजनकरणारी अनेक चॅनेल्स आहेत, परंतु भक्ती व मनोरंजन यांची सांगड घालून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी साईलीलाटीव्ही सातत्याने प्रयत्न करेल. शिवाय हे चॅनेल 'हिंदी' भाषेत असल्यामुळे महाराष्ट्राची संत परंपरा, संस्कृती व लोककला संपूर्ण देशात व जगातपोहचवणे शक्य होऊ शकेल. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे व सहजजीवन जगण्याचा पाया ह्याच संत परंपरेने संपूर्ण जगाला दिला आहे, हेसंपूर्ण जगापर्यंत पोहचवण्याचे काम साईलीला टीव्ही नेहमीच करत राहील.
 
आज कोरोना मुळे संपूर्ण मानवजात संकटात सापडली आहे. जीवनाकडूनअसणाऱ्या अनाठायी अपेक्षांमुळे मनुष्यप्राणी आधीच खचला होता, त्यातआलेल्या या आस्मानी संकटामुळे तो वैफल्यग्रस्त बनला आहे. अशावेळीसद्गुरू श्री. साईनाथांचा श्रद्धा व सबुरी चा महामंत्र संपूर्ण मानवजातीसाठी संजीवनी ठरेल. जीवन किती साधे पणाने जगता येते याचीशिकवणच बाबांनी त्यांच्या अवतार काळात घालून दिली, मानवतेचा मंत्रदेणाऱ्या साईबाबांच्या विचारांची व शिकवणुकीची आज संपूर्ण जगाला गरज आहे.
 
बाबांची हीच शिकवण भक्तीमनोरंजन या संकल्पनेतूनअनेक कार्यक्रमांची निर्मिती साईलीला टीव्ही ने केली आहे. तसेचसाईलीला टीव्ही चे सर्व कार्यक्रम भक्ती व मनोरंजन वर आधारितअसल्यामुळे तरुण वर्गालाही या सोबत जोडणे शक्य होणार आहे. असे साईलीला टीव्ही चॅनेल लिमिटेडचे किरण निचिते संचालक यांनी सांगितले .