ठाणे जिल्हा राष्ट्रवादीला विधान परिषदेचे डोहाळे ; जिल्हा नेत्यांची कुरकुर वाढली

उमेश मारुती भेरे    04-Jul-2020
Total Views |
विधान परिषदेची राज्यपाल नियुक्त सदस्य पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी म्हणून ठाणे जिल्ह्यातून अनेक प्रस्ताव प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी नेहमी महामंडळासाठी आग्रही असणारे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे फिल्डिंग लावूंन असल्याच्या चर्चा सुरू होत्या .परंतु गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखँडे यानी शहपुरात जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्या नियुक्तीला ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे समर्थन असल्याचा दावा केला होता .विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला दशरथ तिवरे सुद्धा उपस्थित असल्याने त्यानी या स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली होती .
 
याबाबत दशरथ तिवरे याना विचारले असता ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपणच जेष्ठ असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आपल्या नावाला संमती असून प्रदेश कार्यालयात अनेक समर्थन पत्र ही गेल्याचे त्यानी म्हटले आहे .परंतु गेल्या आठवड्यातील पत्रकार परिषद नंतर पदाधिकाऱ्यांची बदललेली भूमिका आणि महिला सदस्यासाठी संधी मिळाल्यास महिला जिल्हाध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपल्याच नावाला पसंती मिळेल असा दावा जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांसोबत विद्याताई वेखंडे यानी केला आहे .
 
दरम्यान माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावाची पक्षाकडून चर्चा सुरू असल्याने ठाणे जिल्ह्याला दुसरी संधी मिळेल अशी शक्यता कमी आहे .तसेच राज्यपाल नियुक्त विधानपरिष सदस्य कला, क्रीडा, सांस्क्रुतिक सामाजिक क्षेत्रातून निवडले जात असल्याने दशरथ तीवरे याना संधी मिळेल अशी शक्यता कमी असल्याने त्यानी महामंडळासाठी जोर लावल्याचे समजते.
 
Dashrath Tivre_1 &nb
 
' कोरोना मुळे महामंडळ नियूक्त्या लांबणीवर गेल्या आहेत अन्यथा एक - दोन महिन्या आधीच माझी एखाद्या महामंडळांवर नियुक्ती झाली असती .परंतु विधान परिषद साठी माझ्या नावाला नक्की पसंती मिळेल असा विश्वास आहे "
- दशरथ तिवरे, ग्रामीण ठाणे जिल्हाध्यक्ष रा .कॉं.पार्टी
 

DashVidya Vekhanderath Ti 
"महिला जिल्हाध्यक्षा म्हणून तसेच राज्यातील महिला नेत्रूत्व म्हणून आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खासदार सुप्रीयाताइ सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष कार्यरत आहोत .त्यामुळे महिला सदस्य विधान परिषदेत पाठवायचा झाल्यास आपल्याच नावाची शिफारस होईल ."
- विद्याताई वेखँडे, महिला जिल्हाध्यक्षा, रा .कॉ.पार्टी