मोखाडा सभापतींनी घेतला आरोग्य सेवेचा आढावा

पारस सहाणे    30-Jul-2020
Total Views |
जव्हार : किनिस्ते येथे आदिवासी चा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारीका निकम यांनी तालुक्यातील संपूर्ण आरोग्य सेवेचा आढावा घेत वस्तुस्थितीची पाहाणी केली असून आरोग्य अधिका-यांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.
 
Mokhad baithak_1 &nb
 
तालुक्यातील मौजे किनिस्ते येथील आदिवासी तरुणाचा सर्पदशाने मृत्यू झाला होता त्याची दखल घेवून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला सभापती निकम यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत जि. प. सदस्य प्रकाश निकम, ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम, खोडाळ्याचे उपसरपंच मनोज कदम तालुका आरोग्य अधिकारी किशोर देसले, सहा. गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे होते.
आत्ता थेट जिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवा
यावेळी करारबद्ध वैद्यकिय अधिकारी प्रामाणिक सेवा देत असून अत्यावश्यक प्राथमिक यंत्रसामुग्री नसल्याने सर्पदंश, अडचणींचे बाळंतपण जिकीरीचे होत आहेत. त्यामुळे अशा गंभीर स्वरुपातील रुग्णांना मोखाडा, जव्हार आदि ठिकाणी न पाठवता थेट जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या सुचणा देण्यांत आली आहे. स्थानिक पातळीवर संदर्भ सेवा दिल्यामुळे वेळेचा अपव्यय होवून रुग्ण दगावत असल्याने प्रस्तुत निर्णय घेतला असल्याचे प्रकाश निकम यांनी सांगितले आहे.

108 मिळाली माघारी
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका जीवनदायी ठरली होती . मात्र कोरोना दरम्यान प्रस्तुत रुग्णवाहिका कोव्हिड साठी वापरात घेतली होती. मात्र येथील गरज लक्षात घेवून तातडीने निकम यांनी ही रुग्णवाहिका प्रा. आ. केद्राकडे वळविली आहे.