शहापूर तालुक्यात स्मशानभूमींच्या दूरावस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर!

उमेश मारुती भेरे    23-Jul-2020
Total Views |
शहापूर : गेल्या आठवड्यात चरीव गावातील स्मशानभूमीची दुरावस्था आणि अंत्ययात्रा रस्त्याअभावी पाण्यातून काढावी लागत असल्याचे चित्र मिडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले . याची दखल घेऊन शिवसेना ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रस्ता बनवून देण्याचे आश्वासन देताच तालुक्यातील इतर गावातील स्मशानभूमीच्या दूरावस्थेच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत . मरणानंतर ही या तालुक्यात अंत्यसंस्कारासाठी यातना सौसाव्या लागत असल्यामुळे सध्या स्मशानभूमींचा विषय
चर्चेत आहे .
 
smashan-bhumi-inmarathi_1
 
प्रत्येक गावाचा विकास फक्त रस्ते, वीज , पाणी पुरवून होतं असतो असा समज आहे . या सर्व मूलभूत गरजा पूरवल्या नंतर बाकी घटकांकडे दुर्लक्ष केले जाते . पण चरीवच्या स्मशानभूमी नंतर तालुक्यातील एक एक करून अनेक स्मशानभूमींच्या दूरावस्थेचे चित्र समोर येत आहे . अनेक गावांत स्मशानभूमीसाठी जागा देण्यास मनाई केल्यामुळे उघड्यावर प्रेत जाळली जातात तर काही ठिकाणी रस्त्याला जागा देत नसल्याने पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागते . या सर्व गावपातळीच्या समस्या चर्चेतून मिटवून पर्याय काढणे गरजेचे आहे .
 
शहापूर तालुक्यातील स्मशानभूमींच्या दूरावस्थेचे हे चित्र हळूहळू समोर येत असल्याने अनेक गावांत स्मशानभूमींच्या नावाने लाटलेल्या निधीचा ही भांडाफोड लवकरच होईल अशी चर्चा आहे .