राशनचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदार आणि कारवाई करा अन्यथा आंदोलन !

जनदूत टिम    23-Jul-2020
Total Views |

- किन्हवलि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा वंचित कडून आरोप

शहापूर : तालुक्यात रास्त भाव धान्य दुकानदारांकडून सातत्याने धान्याचा काळाबाजार होत असतो . या दुकानदारांकडून माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची ही संख्या वाढत असून सुद्धा त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही .

ration-shop_1  
 
डोलखांब भागातील आंबेखोर येथील रास्त भाव धान्य दुकानदार रघुनाथ दत्तात्रय देशमुख या दुकानदाराने अवैध मार्गाने माल विक्री केल्याचे लक्षात येताच महसूल विभागाने काही महिन्यापूर्वी त्याच्यावर किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता .परंतु आजपर्यंत किन्हवली पोलिसांकडून अजूनपर्यंत या दुकानदाराविरोधात तसेच अवैधरित्या माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कोणतेही पाऊल उचलले नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुकाध्यक्ष अनिल कांबळे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी , शहापूर यांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे .
 
या बाबत अनिल कांबळे यांनी किन्हवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे यांच्याशी संपर्क करून कारवाईची मागणी केली असता या प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही , पोलिस उपनिरीक्षक धणवडे यांना संपर्क करण्यास सांगितले असल्याचे लेखी पत्रात म्हटले आहे .अंबेखोरे येथील राशन दुकानदार देशमुख यांच्याविरुद्ध अशा अनेक तक्रारी असून सुद्धा अजूनही अवैधरित्या धान्यविक्री सुरू आहे .
 
तसेच हा माल विकत घेणारे व्यापारी ही मोकाट असल्याने किन्हवली पोलिसांची भूमिका या विषयाबाबत संशयास्पद असल्याचा आरोप वंचित कडून करण्यात आळा आहे . जर किन्हवली पोलिसांकडून कारवाई करण्यात दिरंगाई करण्यात आली तर आपण लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचितचे शहापूर तालुकाध्यक्ष अनिल कांबळे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या पत्रात दिला आहे .