राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात १०,५७६ जास्त करोनाग्रस्त

जनदूत टिम    23-Jul-2020
Total Views |
मुंबई : राज्यात १९ जुलै रोजी एकाच दिवसात आढळून आलेल्या करोना बाधित आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली होती. हा उच्चांक बुधवारी मोडीत निघाला. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली असून, यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
 
एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येणारं महाराष्ट्र देशातील कदाचित पहिलंच राज्य आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडताना नागरिकांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरातील करोना रुग्णांची जाहीर केली. राज्यात आज (२२ जुलै) १०,५७६ इतके करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ५, हजार ५५२ इतक्या रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.
 
आतापर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ इतके रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ३६ हजार ९८० इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज १०५७६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३३७६०७ अशी झाली आहे. आज नवीन ५५५२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८७७६९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३६९८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.