पुढील पंधरवडा दुर्मीळ धूमकेतू दर्शनाची संधी

जनदूत टिम    20-Jul-2020
Total Views |
भारतातील खगोलप्रेमींना धूमकेतू पाहण्याची सुवर्णसंधी असून पुढील १५ दिवस भारतीय आकाशात ‘निओवाइस’ नावाचा एक दुर्मीळ धूमके तू भारतातून दिसेल. हा धूमके तू साडेचार हजार वर्षांनी प्रथमच सूर्याजवळ आला आहे. असा योग पुन्हा ६ हजार ८०० वर्षांनी येईल, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
 
comets_1  H x W
 
पुढील १५ दिवस हा धूमके तू उत्तर गोलार्धाच्या उत्तर पश्चिम आकाशात सप्तर्षीजवळ सूर्यास्तानंतर लगेच दिसेल. मात्र, तो सूर्याच्या जवळ असल्याने के वळ २० मिनिटेच पाहण्याची संधी राहील. सध्या तो सप्तर्षीच्या खाली दिसत असून २३ जुलै आणि नंतर हा धूमके तू सप्तर्षीजवळ डाव्या बाजूला दिसू शके ल. ऑगस्टनंतर तो खूप वेगवान होईल. अमेरिका आणि अन्य देशातून धूमके तूचे खूप सुंदर छायाचित्र घेण्यात आले आहे. तसेच जळगावच्या खगोल मंडळालादेखील चांगले छायाचित्र मिळाले आहे.
 
मार्चमध्ये तो सापडल्यापासून पार्कर सोलर प्रोब, नासाचे सौर आणि स्थळीय वेधशाळा, ईसा/नासा सौर आणि हेलिओसफे रीक वेधशाळेने तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर यांच्यासह अनेक नासा अंतराळ यानांद्वारे शोधले गेले. पावसाळ्याामुळे समस्या असली तरीही जेव्हा आकाश ढगाळ नसेल तेव्हा सर्व खगोलप्रेमींनी या सुंदर धूमके तूचे निरीक्षण करावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
 
अधिक ठळक दिसणार..
‘निओवाईस’ धूमके तू हा १५ जुलैपासून भारतात वायव्य दिशेला सूर्यास्तानंतर दिसत आहे. तो २३ जुलैला पृथ्वीजवळ असेल. त्यामुळे पुढील आठवडय़ात तो अधिक स्पष्ट होईल. डोळ्यांनी तो एखाद्या ताऱ्याप्रमाणे दिसेल, पण लहान दुर्बिणीने त्याची सुंदर शेपटी पाहायला मिळेल. २०२० मध्ये ‘स्वान’ आणि ‘अ‍ॅटलास’नंतरचा हा तिसरा धूमके तू आहे.
दुर्लभ योग.. या धूमके तूचा शोध या वर्षी २७ मार्चमध्ये ‘निओवाईस’ मोहिमेअंतर्गत अंतराळ दुर्बिणीद्वारे लागला. या धूमके तूचे अधिकृत नाव ‘सी/२०२०-एफ ३’ आणि उपनाव ‘निओवाईस’ असे ठेवले गेले. ‘निओवाईस’ पाहणे ही एक सुवर्णसंधी आहे, कारण तो नंतर दहा अब्ज किलोमीटर दूर जाईल.