रायते येथील गुरचरण जागेवर अतिक्रमण हटविण्यात ग्रामपंचायत व महसूल विभागाला यश

जनदूत टिम    02-Jul-2020
Total Views |
टिटवाळा: गेली अनेक वर्षापासून रायते ग्रामपंच हद्दीत असलेल्या गुरचरण जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करून तसेच सरपंच यांनीही याबाबत प्रशासनावर पत्रव्यवहार केला होता. परंतु कारवाई काय होत नव्हती. अखेर सोमवारी या कारवाईला मुहूर्त मिळाला. सरपंच पद्मश्री जाधव व मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांच्यात धडाकेबाज कारवाईने गुरुचरण जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यश आले.
 
Titwala_1  H x
 
कल्याण तालुक्यातील रायते ग्रामपंचायत हद्दीतील सव्हेनंबर ५९, ७४,७५,१४७,१८४ व ६४/१ या १३ एकर गुरूचरण भूखंडावर गावातील काही व्यक्तीने अतिक्रमण करून बांधकाम व इतर गोष्टी केल्या होत्या. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व सरपंच यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करत, संबंधित बांधकाम निकषित करण्यासाठी पत्र व्यवहार केले होते. याची दखल घेत कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन व कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडून सदर अतिक्रमण आठविण्या संदर्भात आदेश‌ देखील काढण्यात आले‌ होते. परंतु आजपर्यंत या अतिक्रमणावर कारवाई केली जात नव्हती. परंतु या बाबत ठाम भूमिका घेत गुरुवारी मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची मिटिंग घेऊन संबंधित अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर सोमवारी या अतिक्रमण केलेल्या भूखंडावर बांधकाम व इतर गोष्टी निकषित करून संबंधित भूखंड शासनाच्या ताब्यात घेतले असून सदर ठिकाणी फलक देखील लावण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान काही प्रमाणात अतिक्रमण धारकांनी विरोध केला परंतु या विरोधाला न डगमगता कारवाई पूर्ण करण्यात आली.
 
खालिस्तान दहशतवादी संघटनांचा रक्तलांछीत पैसा घेऊन ट्विटर च्या भारत विरोधी कारवाया- कांचन खरे- बर्वे देशात अराजक निर्माण करण्यासाठी ट्विटर इंडिया आणि खालिस्तानी चळवळीचे नवे षडयंत्र- कांचन खरे- बर्वे 
खोपिवली येथील पुलाच्या अर्धवट कामामुळे व पर्यायी रस्ता पुरात वाहून गेल्या मुळे म्हसा-धस ई संपर्क तुटला.
या कारवाईमुळे स्थानिकांतून मंडळ अधिकारी साळुंखे, सरपंच जाधव व सदस्य यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशा प्रकारची अतिक्रमण केलेल्या गुरुचरण जागेवरील ही तालुक्यातील पहिलीच कारवाई असल्याचे सर्वच स्थरातून बोलले जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व मंडळ अधिकारी यांनी अशा प्रकारे तालुक्यातील गुरचरण जागेवर झालेल्या भूखंड बाबत कारवाई केली, तर शासकीय भूखंड मोठ्याप्रमाणात मोकळे होण्यास मदत होईल अशा प्रकारचा सूर देखील निघत आहे.
 
या कारवाईत सरपंच पद्मश्री जाधव, उप सरपंच संदिप सुरोशी, सदस्य हरेश पवार, सुभाष जाधव, कमल सुरोशी, निर्मला गोडांबे, मंडळ अधिकारी संजय साळुखे, तलाठी हनुमंत जाधव, ग्रामसेवक पवार, पो.उ.नि. प्रदिप आरोठे, पो. ना. किशोर आयरेकर आदींनी मोलाची भूमिका बजावली.