विकाऊ राजकारण्यांनो आणि बेशिस्त अधिकाऱ्यांनो; जरा दमानं, गाठ शहापुरकरांशी आहे

जनदूत टिम    05-Jun-2020
Total Views |
लोकसेवक हा जनतेची कामे करण्यासाठी शासनाने ठेवलेला पगारी नोकर असतो,त्यामुळे यापुढे शहापुर तालुक्यातील अधिका-यांनी जनतेच्या वरचढ होण्याचा बालिशपणा करु नये अन्यथा तालुक्यातील जनता आपला इंगा दाखवणार असे वातावरण निर्माण होत आहे.
 
opinion_4_0_1  
 
या तालुक्यातील जनता एखाद्याला ज्या वेगाने डोक्यावर घेते त्याच्या दुप्पट वेगाने त्याला हद्दपार करते याची अनेक उदाहरणे आहेत. मग तो राजकारणातला बादशहा असो ,एखादा कर्मचारी असो अथवा श्रेणी 1 चा अधिकारी असो.इथे चुकीला माफी नाही.
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर तालुक्यात तहसिलदार,गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक,पोलीस निरीक्षक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अथवा स्थानिक आमदार असुद्या यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे जगजाहीर म्हणजे गावातील नागड्या पोरालासुद्धा माहीत झाले,एवढी पत तुम्ही कमावले.ज्याला गावात किंमत नाही असे एकदोन राजकीय दलाल पुढारी हाताशी घ्यायचे आणि वातावरण दुषित करायचे हा रंडीबाज खेळ आता अधिका-यांनी थांबवायचा आणि राजकारण्यांनी लक्षात ठेवायचा.शासन कोरोना संदर्भात प्रचंड अलर्ट असतांना या अदिवासी बहुल तालुक्यात प्रसारमाध्यमांना वेळेवर प्रेसनोट मिळु शकत नाही ,जेणेकरून जनतेपर्यंत शासनाची भूमिका पोहचू शकेल मात्र त्या प्रेसनोटवरूनही राजकारण करता. सदर प्रेसनोट जाणीवपूर्वक संध्याकाळी 6 नंतर दिली जाते.
 
कारण कोरोना बाधितांचा अधिकृत आकडा जनतेपर्यंत पोहचला नाही पाहिजे.हाच प्रकार पोलीस स्टेशनचा,हाच प्रकार पंचायत समितीचा आणि हाच प्रकार आदिवासी प्रकल्पाचा.कोणाचा कोणाला पायपोस नाही. आपण शासनाचा पगार घेतो याचे भान ठेवा.तुम्ही बदलीसाठी कर्मदरिद्री भाडखाऊ राजकारण्यांना पैसे चारले म्हणजे जनतेला विकत घेतले असे होत नाही याचेही भान ठेवा.विशेष म्हणजे या तालुक्यातील राजकारण्यांना समाजसेवा करण्यासाठी अजुन दहा जन्म घ्यावे लागतील तेव्हा कुठे राजकारण कळेल.फक्त मांडवल्या केल्या म्हणजे राजकारण केले असे होत नाही,तीला दलाली म्हणतात. समाजसेवा रक्तात असावी लागते.तुमच्या अशा भिकरचोट वागण्याने तुम्हाला एखाद्या कार्यालयाचा शिपाई देखील नमस्कार करत नाही,एवढी तुमची लायकी आहे.
 
यामुळे तुम्ही लोकांच्या गळ्यातील ताईत बनण्याचे स्वप्न सोडुन द्या कारण तेवढी तुमची पात्रता नाही.तुमचं पद ज्या दिवशी जाईल त्याच दिवशी तुम्हीसुद्धा गेले म्हणून समजा.नाव कमवायला त्याग करावा लागतो आणि स्वाभिमान जागृत ठेवावा लागतो, मात्र तो तुमच्या असापासही दिसत नाही.तुमच्या अशा विकाऊपणामुळे येथे येणारे शेंबडे अधिकारीही मुजोर झाले आहेत.एवढेच नाही तर साधा ग्रामसेवक आणि तलाठी सुद्धा आमच्या गावकऱ-यांवर रुबाब करतात. या तालुक्याचे नशीब असे की, ठराविक पत्रकार बांधव नैतिकता सांभाळून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडतांना दिसत आहेत,अन्यथा या तालुक्याला गि-हईक शोधावा लागला असता. दरम्यान राजकारणी मंडळी ठेवा बाजुला आता जनतेने आवाज उठवावा,आम्ही तुमच्या सोबत आहोत.