अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात

जनदूत टिम    04-Jun-2020
Total Views |
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, ११ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
 
Ashok Chavhan_1 &nbs
 
कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चव्हाण यांना मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत अशोक चव्हाण कोरोनामुक्त झाले असून, त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस ते विलग राहणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले चव्हाण यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी शुक्रवारी दुपारी सर्वत्र वेगाने पसरली. ते बरे झाल्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.