मुंबई महानगर पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांन मुळे खर्डी-वाडा संपर्क तुटला

अनिल घोडविंदे    29-Jun-2020
Total Views |

- ७ महीन्यानी सुरू झालेले पुलाचे काम स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी केले बंद
- प्रकल्प ग्रस्त म्हणून भास्कर आरे या आदिवासी शेतकऱ्याला मुंबई महानगर पालिकेत नोकरी देण्याची मागणी

शहापूर: खर्डी-वाडा रस्त्यावरील बलवंडी फाटा येथील पूल ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पडला होता या घटनेला ७ महिने उलटून गेले होते याबाबत टेभा ग्रापंने वारंवार पत्रव्यवहार केल्याने मुंबई मनपाने सदर पुलाचे काम ऐन पावसाळ्यात कोणते ही टेंडर न करता सुरू केले ही परंतु येथील स्थानिक शेतकरी भास्कर आरे व त्यांच्या कुटुंबांनी सदर काम बंद केले यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या बेजबाबदार पणा चा फटका पुन्हा एकदा येथील नागरिकांना बसला असून यामुळे खर्डी-वाडा संपर्क तुटला आहे.
 
Khardi-vada Road_1 &
 
येथून ये-जा करणाऱ्या शेकडो जड वाहनांनाआटगाव येथून ४० किमीचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे, या रस्त्यावरील अनेक गावांच्या रहिवाश्याची दळणवळणाची सोय बंद झाली आहे शिवाय येथील शेतकऱ्यांना पलीकडे शेती लावण्यासाठी जावे लागते त्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे, नुकताच या पुलावर वैतरणा येथील जेष्ठ नागरिक अन्वर शेख जात असतांना त्यांचा पाय घरसल्याने हात मोडला असून ते शहापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत यामुळे येथील रहिवाशी मुंबई मनपा विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
 
खर्डी-वाडा या रस्त्यावरून वाडा तालुक्यातील औधोगिक वसाहती कडे जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मुंबई-आग्रा महामार्गावरिल खर्डी येथून वाडयाला जायला शॉर्टकट असल्याने नाशिक वरून वाडा, पालघर,डहाणू, गुजरात, कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. दिवसागणिक वाहनांची वर्दळ वाढत असल्याने या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीसाठी कोणती ही पर्यायी व्यवस्था नसल्याने सदर पूलाच्या अर्धवट कामामुळे परिसरातील टेंभा,आंबिवली,भोसपाडा, बळवंडी, बेलवड सह वाडा तालुक्याचा देखील संपर्क तुटला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.खर्डी-वाडा एसटीची वहातुक ७ महिन्यापासून बंद झाली आहे.
 
सदर पुलाच्या बांधकामाला येथील शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे त्यांचं म्हणणं देखील मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच ऐकुन घेऊन तोडगा काढला असता तर या पुलाचे तात्पुरत्या स्वरूपाचे काम देखील वेळीच पूर्ण झाले असते परंतु या अधिकाऱ्यांच्या हेखे खोर पणा चा फटका मात्र स्थानिक नागरिकांना बसत आहे.